गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला, डाव फसल्यानं मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 22, 2021 | 2:59 PM

नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनवर हल्ला केलेला आहे. Naxal granite attack on Gatta Police station

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला, डाव फसल्यानं मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं?
गडचिरोली नक्षलवादी हल्ला
Follow us on

गडचिरोली: नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनवर हल्ला केलेला आहे. छत्तीसगडला लागून असलेल्या सीमावर्ती भागात असलेल्या पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला करण्यातआला. मात्र, ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्यानं मोठा अनर्थ टळला. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते. (Naxal granite attack on Gatta Police station in Gadchiroli)

एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर हल्ला

नक्षलवाद्यांनी त्यांचा मोर्चा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याकडे वळवल्याचं चित्र आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर नक्षलवाद्यांनी ग्रॅनाईट टाकला. या ग्रॅनाईट स्फोट झालेला नाही. यामुळे एक मोठा अनर्थ टळला. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जात आहे. पोलीस स्टेशन पर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क व्हावं लागणार आहे.

पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

नक्षलवादी या पोलीस स्टेशन परिसरात कसे आणि कुठून आले? गट्टा पोलीस स्टेशन परिसरात ग्रॅनाईट टाकलेला नक्षल दलम कोणता? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांची पथक शोध आपरेशन राबवित आहेत.

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या सीआरपीएफ जवानांवर हल्ला

छत्तीसगढच्या बिजापूर येथील जंगलात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये नक्षलवादी (Naxal Attack) आणि भारतीय जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. या चकमकीत 22 भारतीय जवान शहीद झाले. तर 31 जवान जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय सुरक्षादलांवर नक्षलवाद्यांकडून झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता. या चकमकीपूर्वी नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांना रणनीती आखून जंगलाच्या आतमध्ये येऊन दिले. 300 ते 400 नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांच्या एका तुकडीला चारही बाजूंनी घेरले. त्यानंतर भारतीय जवानांवर गोळीबार करण्यात आला. नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जाते.

संबंधित बातम्या:

Chhattisgarh Maoist Attack: नक्षलवाद्यांनी कसा हल्ला केला, भारतीय सुरक्षादलांची चूक कुठे झाली, वाचा इनसाईड स्टोरी

Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांची उच्च स्तरीय बैठक

(Naxal granite attack on Gatta Police station in Gadchiroli)