
जेव्हा लग्नाची वरात घेऊन वर त्याच्या भाव वधूच्या दाराशी पोहोचला तेव्हा खूपच आनंदी होता. थोड्याच वेळात आपलं लग्न होणारे या भावनेने त्यांच्या चेहरा आनंदाने फुलला होता. पण लग्न लागताच त्याला असा झटका बसला की डोक्यावर हातच मारून घ्यावा लागला. लग्न लागल्यावर वधूच्या कुटुंबियांनी वराच्या कुटुंबाला सांगितलं की आम्ही काही वस्तू विसरलो आहोत, त्या घेऊन येतो. असं म्हणत ते वधूलाही सोबत घेऊन गेले. बराच वेळ झाला तरी ते परत काही आलेच नाही, वराकडचे लोक त्यांची वाट पहात होते. मात्र पहाट होता होता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं. कारण जिच्याशी नुकतंच लग्न झालं, त्या नववधूने आपल्याला मोठा धोका दिलाय हे वराला आणि त्याच्या कुटुंबियांना समजलं . लग्न लागताच वधू ही लग्न मंडपातूनच सगळे दागिने आणि पैसे घेऊन तिच्या गँगसोबतच फरार झाली. माझी पत्नी पळून गेली असं वराने त्याच्या आईला सांगितलं आणि एकच गदारोळ माजला.
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. या ठिकाणचे रहिवासी नान सिंग यांचे लग्न होत नव्हते, त्यामुळेच सिंग कुटुंब चिंतेत होते. एके दिवशी नान सिंगचा मोठा भाऊ एका मध्यस्थाला भेटला. मध्यस्थ कैलाश सिंगने सांगितले की नान सिंगसाठी एका मुलीचं स्थळ आलं आहे. आसमा असं तिचं नाव आहे. नान सिंग आणि त्याच्या कुटुंबियांना मुलीचा फोटो दाखवण्यात आला, त्यांना ती मुलगी आवडली. लग्न ठरलं आणि आदिवासी रितीरिवाजांनुसार त्या दोघांचं लग्न लागलं.
साथीदारासोबत नववधू झाली फरार
मात्र लग्न लागल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी नान सिंगच्या कुटुंबीयांना सांगितले की लग्नानंतर ते घरी काही वस्तू विसरले आहेत. यानंतर ती नववधू आणि तिचे साथीदार सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन घटनास्थळावरून पळून गेले. दुसऱ्या दिवशी मुलाच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली. मनोरंजक गोष्ट म्हणजे, या प्रकरणात, आसमाचा खरा नवरा तिचा मेहुणा बनला. तर या लग्नात इलाम सिंग मुलीचा पिता बनला. या लग्नासाठी हिरालाल नावाच्या माणसाने त्याचे घर उपलब्ध करून दिले होते.
पाच आरोपींना अटक
पण जेव्हा ही फसवणुकीची घटना उघडकीस आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नान सिंगच्या कुटुंबाने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आसमा आणि तिच्या पतीसह पाच जणांना अटक केली.