विनायक शिंदे नाही, सुनिल मानेचा मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी फोन, NIA चा दावा

| Updated on: Apr 23, 2021 | 3:42 PM

सुनील माने मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचंही एनआयएने कोर्टात सांगितलं (NIA Sunil Mane Mansukh Hiren )

विनायक शिंदे नाही, सुनिल मानेचा मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी फोन, NIA चा दावा
पोलीस निरीक्षक सुनील माने
Follow us on

मुंबई : मनसुख हिरेन यांना (Mansukh Hiren Murder Case) हत्येच्या दिवशी फोन करणारा विनायक शिंदे नसून पोलीस निरीक्षक सुनील माने (Sunil Mane) असल्याचा दावा राष्ट्रीय पोलीस यंत्रणेने कोर्टात केला. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सुनील मानेला अटक करण्यात आली आहे. (NIA claims PI Sunil Mane called Mansukh Hiren on Murder Day)

कांदिवली क्राईम ब्रांचमधून बदली

मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी सुनील माने यानेच फोन करुन त्यांना बोलावलं होतं. सुनील माने मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचंही एनआयएने कोर्टात सांगितलं. सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 चा माजी पोलीस निरीक्षक आहे. सध्या त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेला एनआयएने अटक केली आहे.

कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन

आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं? याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांच्या चौकशीतून एटीएसच्या हाती अनेक पुरावे आले आहेत. त्याशिवाय एटीएसने सचिन वाझेंचं लोकेशन तपासलं आणि मोबाईल टॉवर आणि आयपीचं मूल्यांकनही केलं होतं. तसेच अनेक गाड्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकण्यात आलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, कांदिवली क्राईम ब्रांचच्या पोलीस निरीक्षकाची ATS कडून चौकशी

पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी बेड्या

(NIA claims PI Sunil Mane called Mansukh Hiren on Murder Day)