Indore Crime : पैसे घेतल्याच्या संशयातून घरमालकाकडून भाडेकरुला बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकले

| Updated on: Jul 11, 2022 | 5:22 PM

काही दिवसांपूर्वी नाझिमच्या मुलाने घरातून 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी पंकजने नवीन लॅपटॉप आणला. तेव्हापासून पंकजने आपल्या मुलाकडूनच 50 हजार रुपये घेऊन हा लॅपटॉप आणला, असा संशय नाझिमला होता.

Indore Crime : पैसे घेतल्याच्या संशयातून घरमालकाकडून भाडेकरुला बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकले
Follow us on

इंदूर : आपल्या मुलाकडून 50 हजार रुपये घेतल्याच्या संशया (Suspicious)तून एका आदिवासी विद्यार्थ्याला त्याच्या घरमालकाने तीन मित्रांसोबत मिळून जबर मारहाण (Beating) केल्याची घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली आहे. नराधम मारहाणीवर थांबले नाहीत तर त्यांनी पीडित मुलाच्या प्रायव्हेट पार्ट (Private Part)मध्ये पेट्रोलही टाकले. त्यानंतर प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करत त्याचा नग्न व्हिडिओ बनवला. चार मुस्लिम तरुणांनी अनेक तास विद्यार्थ्याला मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्याला घरी सोडण्यात आले. यावेळी झाल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी देत कुणी विचारल्यास अपघात झाल्याचे सांगण्यास सांगितले.

50 हजार रुपयांच्या संशयावरून मारहाण

काही दिवसांपूर्वी नाझिमच्या मुलाने घरातून 50 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी पंकजने नवीन लॅपटॉप आणला. तेव्हापासून पंकजने आपल्या मुलाकडूनच 50 हजार रुपये घेऊन हा लॅपटॉप आणला, असा संशय नाझिमला होता. मात्र पंकजच्या कुटुंबीयांनी त्याला हा लॅपटॉप अभ्यासासाठी घेऊन दिला होता. नाझीमला त्याचा बदला घ्यायचा होता. याच कारणावरून ईदच्या एक दिवस आधी त्याने पंकजवर अत्याचार केला. त्याच्या या कृत्यात त्याचे इतर साथीदारही सामील झाले होते.

ही मारहाणीची घटना संशयातून घडली आहे. मूळचा अलीराजपूरचा रहिवासी असलेला पंकज इंदूरमध्ये आरोपी नाझीमच्या घरी भाड्याने राहत होता. येथे त्याच्या दोन बहिणीही त्याच्यासोबत राहत होत्या. ईदच्या एक दिवस आधी नाझीमने पंकजला ईदसाठी बकरे आणण्यासाठी जायचे सांगून त्याच्या मित्राच्या घरी नेले. गच्चीवर बकरा असल्याचे सांगितले. मात्र काही वेळाने नाझीमने त्याला एका बंद खोलीत नेऊन इतर तीन मित्रांसोबत मिळून मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याच्या गुप्तांगात पेट्रोल टाकून प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. यानंतर आरोपीने विद्यार्थ्याचा व्हिडिओही बनवला. व्हिडिओमध्ये नाझिमने विद्यार्थ्याला जबरदस्तीने घरातून 50 हजार रुपये घेण्यास सांगितले.

कुणाला याबाबत सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

या प्रकाराबाबत कोणाकडे तक्रार केल्यास व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी आरोपींनी दिली. याबाबत विद्यार्थ्याने पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या घरमालकासह अन्य लोकांना गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मात्र, त्यानंतर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस नियंत्रण कक्ष गाठून अनेक गंभीर कलमांत आणखी वाढ करण्याची मागणी सुरू केली. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. (On suspicion of taking money, the landlord beat up the tenant and poured petrol into the private part)