मधुचंद्राच्या रात्री नव्या नवरीसोबत जे घडलं ते ती आयुष्यभर नाही विसरणार, कारण नवरा वहिनीच्या…

पती एका खासगी कंपनीत नोकरीला होता. निकाहच्या दुसऱ्यादिवशीच तिची अहमदाबादला पाठवणी झाली. तिथे दावते वलीमा झालं. सासरी गेल्यानंतर मधुचंद्राच्या रात्री तिला मोठं सत्य समजलं.

मधुचंद्राच्या रात्री नव्या नवरीसोबत जे घडलं ते ती आयुष्यभर नाही विसरणार, कारण नवरा वहिनीच्या...
wedding night
| Updated on: Dec 27, 2025 | 4:33 PM

एक नवरी मुलगी डोळ्यात अनेक स्वप्न साठवून नवरदेवासोबत सासरी आली. पण मधुचंद्राच्या रात्री तिच्यासोबत असं काही झालं की, ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. नववधू संपूर्ण रात्रभर नवरदेवाची वाट पाहत होती. पण नवरदेव खोलीत आला नाही. अखेरीस दिवसभराच्या थकव्यामुळे ती झोपून गेली. पण सकाळी उठल्यानंतर तिने पाहिलं की, तिचा नवरा वहिनीच्या खोलीतून बाहेर येतोय. हे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची ही घटना आहे.

नंतर ही गोष्ट नित्याचीच झाली. रोज असच घडू लागलं. नवरा तिच्या खोलीत यायचाच नाही. तो वहिनी म्हणजे नवरीची जाऊबाई तिच्याखोलीत झोपायला जायचा. शेवटी ती किती दिवस हे सहन करणार. तिने विरोध केला. नव्या नवरीने हा आरोप करताच वहिनी आणि पतीने मिळून तिला मारहाण केली. घरातून काढून टाकलं.

छळ केल्याचा आरोप

विवाहितेने नंतर पोलिसांची मदत मागितली. पती आणि दीर-जाऊबाई विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. ही घटना गोरखपुरच्या बेलीपार पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. 30 वर्षाच्या नव्या नवरीने तिच्या पतीवर वहिनीसोबत अनैतिक संबंधांचा आणि हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप केला.

प्रत्येक रात्री हेच सुरु होतं

पीडितेने तक्रारीत सांगितलं की, 13 जुलै 2025 रोजी तिचा निकाहल बांसगांव पोलीस ठाणे क्षेत्रातील युवकाशी झाला होता. पती अहमदाबाद येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. निकाहच्या दुसऱ्यादिवशीच तिची अहमदाबादला पाठवणी झाली. तिथे दावते वलीमा झालं. सासरी गेल्यानंतर मधुचंद्राच्या रात्री ती रात्रभर नवऱ्याची प्रतिक्षा करत होती. पण नवरा तिच्या खोलीत आला नाही. दुसऱ्यादिवशी तिने पाहिलं की, नवरा वहिनीच्या खोलीतून बाहेर येतोय. प्रत्येक रात्री हेच सुरु होतं.

ती कशीबशी माहेरी पोहोचली

जेव्हा तिने विरोध केला, तेव्हा पती आणि वहिनीने मिळून तिला मारहाण केली. पैसे द्यायला नकार दिला म्हणून सासरच्यांनी तिला मारहाण करुन घराबाहेर काढलं. लोकांकडून मदत घेऊन ती कशीबशी गोरखपुर येथे माहेरी पोहोचली. 21 ऑक्टोंबरपासून ती इथेच राहतेय. पीडितेचे आई-वडिल अहमदाबादला गेले, तेव्हा त्यांना पळवून लावलं.बेलीपार पोलीस ठाण्याचे प्रभारी विशाल कुमार सिंह यांनी सांगितलं की, पीडितेच्या तक्रारीवरुन पती, दीर आणि वहिनी विरोधात सबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. साक्षीदारांच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल.