AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांनंतरच नववधूने पतीसोबत केले निर्घृण कृत्य, कारण जाणून तुम्हीही

प्रियकराचे आई-वडील त्याचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देत असल्याचे कळताच तिने त्याला भेटण्यास बोलावले व दोघांनी मंदिरात लग्नही केले.

लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांनंतरच नववधूने पतीसोबत केले निर्घृण कृत्य, कारण जाणून तुम्हीही
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 08, 2023 | 4:53 PM
Share

पाटणा : लग्न झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी नववधूने तिच्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ( wife stabbed husbands private parts) वार करत त्याला जखमी केल्याची अजब घटना घडली. पाटणा येथे ही धक्कादायक घटना घडली. वराचे आई-वडील त्याचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देत असल्याचे कळल्याने ती नाराज झाली, त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच हा प्रकार घडला. पाटणा शहरातील न्यू डाक बंगला रोडवरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली.

नेहा कुमारी असे आरोपी महिलेचे नाव असून सूर्यभूषण कुमार असे पीडित इसमाचे नाव आहे. तो सीआरपीएफ जवान आहे. हे दोघंही काही काळापासून हे एकमेकांना डेट करत होते. मात्र सूर्यभूषण कुमार याचे आई-वडील त्याचे दुसऱ्याशी लग्न लावण्याचा प्रयत्न करत आहे, हे कळल्यावर तिने त्याला पाटण्याला भेटायला बोलावले.

दबावाखाली कुमार हा 3 जून रोजी पाटणा येथे आला व त्या दोघांनी 5 जून रोजी न्यायालयात लग्न केले. पीडित इसमाने (दुसऱ्या मुलीशी) ठरलेले लग्न मोडावे यासाठी आरोपी महिलेने त्याच्यावर प्रचंड प्रेशर आणले. अखेर त्या दोघांनीही शहरातील न्यायालयात लग्न केले आणि हॉटेलमध्ये रहायला गेले, असे पोलिसांनी सांगितले.

मात्र बुधवारी या जोडप्यामध्ये लग्न मोडण्यावरून वाद झाला, महिलेला राग आला. तिने एकतर त्याला मारून टाकेन किंवा आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. त्यांचं भाडण वाढत गेले आणि संतापलेल्या महिलेने चाकू काढला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित इसमाने खोलीबाहेर धाव घेत हॉटेल स्टाफकडे मदत मागितली. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आरोपी महिलेला अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.

ल त्याचे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देत असल्याचे कळताच तिने त्याला भेटण्यास बोलावले व दोघांनी मंदिरात लग्नही केले.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.