Pune crime : आधी व्हिस्की पाजली मग बलात्कार केला; पिंपरी चिंचवडमधल्या नराधमाला पोलिसांनी दाखवला हिसका

एका फायनान्शियल सोल्युशन्स कंपनीत ही तरुणी काम करते. संबंधित तरुणीचे नुकतेच वीस वर्ष पूर्ण झाले आहे. नराधम आरोपी 31 वर्षीय असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवासी आहे.

Pune crime : आधी व्हिस्की पाजली मग बलात्कार केला; पिंपरी चिंचवडमधल्या नराधमाला पोलिसांनी दाखवला हिसका
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 26, 2022 | 3:56 PM

पुणे : आपल्याच ऑफिसमधील कनिष्ठ सहकाऱ्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी फायनान्शियल सोल्युशन कंपनीत काम करणाऱ्या 31 वर्षीय तरुणाला आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. वयाच्या 20व्या वर्षात असलेल्या तरुणीने शनिवारी रात्री उशिरा पोलिसांत तक्रार दाखल केली आणि आरोप केला, की संबंधित पुरुषाने तिच्यावर दोनदा बलात्कार केला. प्रथम तिला त्याच्या घरी दारू पाजल्यानंतर आणि नंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत त्या व्यक्तीला अटक केली आहे. मागील महिनाभरापासून या तरुणीला या व्यक्तीच्या त्रासाचा सामना करावा लागत होता. मात्र, या घटनेनंतर तिचा संयम सुटला आणि तिने पोलिसांत धाव घेतली.

फोटो व्हायरल करण्याची धमकी

एका फायनान्शियल सोल्युशन्स कंपनीत ही तरुणी काम करते. संबंधित तरुणीचे नुकतेच वीस वर्ष पूर्ण झाले आहे. नराधम आरोपी 31 वर्षीय असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवासी आहे. शनिवारी उशिरा नोंदवलेल्या माहितीनुसार, आरोपीने 6 आणि 10 जून रोजी महिलेवर बलात्कार केला. 6 जून रोजी आरोपीने तिला आपल्या घरी जेवायला बोलावले. व्हिस्की दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर 10 जून रोजी त्याने तिला आपल्या घरी बोलावले. तिचे काही फोटो त्याच्याकडे होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

पीडितेने शनिवारी पहाटे पोलिसांना केला फोन

शनिवारी पहाटे 2.30च्या सुमारास त्याने तिला पुन्हा फोन केला. तेव्हा महिलेने पोलिसांशी संपर्क साधला आणि एफआयआर नोंदवण्यात आला. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 376 (2)(एन)नुसार वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी, 354 (अ) लैंगिक शोषणाची मागणी करून लैंगिक छळ केल्याबद्दल आणि गुन्हा करण्याच्या उद्देशाने विष देऊन दुखापत केल्याबद्दल 328 या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीला अटकही करण्यात आली आहे.