पोलीस दादालाच 22 हजार रुपयांचा ऑनलाईन चुना, ओटीपी ने देताही ऑनलाईन गंडा कसा घातला, जाणून घ्या

सायबर गुन्हे कमी व्हावेत याकरिता सर्वसामान्य नागरिकांना सायबर पोलीसांच्या सेलकडून विविध प्रकारच्या सूचना दिल्या जातात. मात्र, त्याच पोलीस दलातील अधिकाऱ्याची फसवणूक कशी झाली याची चर्चा आता होऊ लागली आहे.

पोलीस दादालाच 22 हजार रुपयांचा ऑनलाईन चुना, ओटीपी ने देताही ऑनलाईन गंडा कसा घातला, जाणून घ्या
Image Credit source: Google
| Updated on: Dec 06, 2022 | 3:52 PM

नाशिक : फसवणूक होऊ नये याकरिता काय काळजी घ्यावी ? ऑनलाईन कुणी गंडा घालणार नाहीत, ऑनलाईन व्यवहार करतात काय काळजी घ्यावी ? शक्यतो ओळख पटवून किंवा रोखीने व्यवहार करावे अशा विविध जनजागृतीपर सूचना पोलीस करत असतात. विशेषतः सायबर पोलिसांची ही जबाबदारी मानली जाते. मात्र, याच पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्याची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्याचीच फसवणूक झाल्याने पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली होती, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची ही फसवणूक झाली असून सोमवारी ही घटना घडली आहे. तब्बल 22 हजार रुपयांची ही आर्थिक फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ओटीपी न देता पैसे गेल्यानं पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनाही ही फसवणूक झाली असा प्रश्न पडला आहे.

सायबर गुन्हे कमी व्हावेत याकरिता सर्वसामान्य नागरिकांना सायबर पोलीसांच्या सेलकडून विविध प्रकारच्या सूचना दिल्या जात असतात.

मात्र, त्याच पोलीस दलातील पोलीस निरीक्षक पदावर असलेल्या विकास वाघ यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी 22 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार दिल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी ओटीपी न देता पैसे गेल्याचाही मुद्दा नमूद केला आहे.

सोमवारी पोलीस अधिकारी विकास वाघ यांनी मुंबईला जायचे होते, त्याकरिता रेंट अ कार या वेबसाइटला भेट दिली होती, त्यावर लॉगिन देखील केले होते.

त्यानुसार इंडिया ट्रॅव्हल नावाच्या ॲप्लिकेशनची लिंक आली होती, त्यानुसार वाघ यांनी त्या लिंकवरुन ॲप डाउनलोड केले होते. त्यावर डेबिट कार्डची माहिती देखील भरली.

मात्र, डेबिट कार्डची माहीती भरताच त्यांना ओटीपी आला परंतु वाघ यांनी तो त्याला दिला नाही. परत त्यांना दुसऱ्यांदा एक ओटीपी आला त्यावेळी त्यांनी बँकेच्या खात्यात जाऊन रकेमची चौकशी केली.

बँक खात्याची तपासणी करतांना पैसे खात्यातून कमी झाल्याचे लक्षात आल्याने बँकेशी संपर्क साधून डेबिट कार्ड बंद केले आहेत.

ओटीपी न देताही पैसे खत्यातून कमी झाल्याने विकास वाघ यांनीही आश्चर्याचा धक्का बसला असून आता या गुन्ह्याचा पोलीस कसा तपास करतात याकडे लक्ष लागून आहे.