Padma Awards : रोहित शर्मा व हरमनप्रीत कौर यांच्यासह क्रीडा श्रेत्रातील दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Padma Award : पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील 131 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव होणार आहे. क्रीडा क्षेत्रातून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. देशातील सर्वात यशस्वी टेनिस खेळाडूंपैकी एक विजय अमृतराज यांनाही पद्मभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. यात कोणत्या खेळाडूंचा आणि कोचचा समावेश आहे ते जाणून घेऊयात.
131 जणांना पद्म पुरस्कार जाहीर
केंद्र सरकारने रविवार 25 जानेवारी रोजी पद्म पुरस्कारांची घोषणा केली, ज्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या वर्षी सरकारने एकूण 131 लोकांची पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. पाच जणांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार पद्मविभूषण देण्यात येणार आहे. तर 13 जणांना पद्मभूषण आणि एकूण 113 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आहेत. क्रीडा जगतातून एक पद्मभूषण आणि आठ जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे.
रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा सन्मान
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली आहे. रोहित शर्माने भारतीय संघाला दोन वर्षांत दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिली होती. त्याआधी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने टी 20 वर्ल्डकप जिंकला होता. ज्यामुळे संपूर्ण देशाला आनंदाचा क्षण मिळाला होता. नोव्हेंबरमध्ये हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेटमध्ये कधीही न अनुभवलेला क्षण देशाला दिला होता. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास रचला होती. महिला क्रिकेटमधील ही भारताची पहिली आयसीसी ट्रॉफी आहे. याच कामगिरीसाठी दोघांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या खेळाडूंचा पद्म पुरस्काराने गौरव होणार
- विजय अमृतराज (टेनिस) – पद्मभूषण
- रोहित शर्मा (क्रिकेट) – पद्मश्री
- हरमनप्रीत कौर (क्रिकेट) – पद्मश्री
- प्रवीण कुमार (पॅरा-ॲथलेटिक्स) – पद्मश्री
- बलदेव सिंग (हॉकी)- पद्मश्री
- भगवानदास रायकवार (पारंपारिक मार्शल आर्ट्स) – पद्मश्री
- के. पंजनिवेल (सिलंबम)- पद्मश्री
- सविता पुनिया (हॉकी) – पद्मश्री
- व्लादिमीर मेस्तविरिशविली (मरणोत्तर) – पद्मश्री (कुस्ती प्रशिक्षक)
