AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजारात घसरण सुरु असताना पतंजलीची मात्र कमाल, कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

गेल्या आठवड्यातील शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टी ०.७० टक्क्यांहून अधिक घसरला होता. मात्र, दुसरीकडे पतंजली फूड्सच्या शेअर्सनी मात्र चांगली कामगिरी केली आहे.

बाजारात घसरण सुरु असताना पतंजलीची मात्र कमाल, कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल
Patanjali foods
| Updated on: Jan 25, 2026 | 8:56 PM
Share

शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असलेली पाहायला मिळत आहे. परंतू गेल्या आठवड्यात सलग तीन कामकाजाच्या दिवसात पतंजली फूड्सचे शेअर मात्र वधारल्याचे पाहायला मिळाले आहेत. खास बाब म्हणजे या तिन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये सुमारे २ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. तर सेन्सेक्स आणि निफ्टीत ०.७० घसरण पाहायला मिळाली आहे. जेथे शेअर बाजारात ओव्हरऑल गुंतवणूकदारांना तीन दिवसात नुकसान झाले. तर दुसरीकडे पतंजलीने त्यांच्या गुंतवणूकदारांना १ हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई करुन दिली आहे. जाणकारांच्या मते येत्या दिवसात पतंजलीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळू शकते. चला तर घसरत्या बाजारातही पतंजली फूड्सच्या शेअर्सने कशी कमाल केली ते….

पतंजलीच्या शेअर्समध्ये उसळी

गेल्या आठवड्याच्या अखेरच्या तीन कामकाजाच्या दिवसात पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. आकड्यांना पाहिले तर २० जानेवारी रोजी कंपनीचा शेअर घसरणीनंतर ५०२ रुपयांवर बंद झाला होता. त्यानंतर २१,२२ आणि २३ जानेवारीत कंपनीच्या शेअर्समध्ये भाववाढ पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर १.९५ टक्के उसळीसोबत ५११.८० रुपयांपर्यंत पोहचून बंद झाला होता. तसे शुक्रवारी कंपनीचा शेअर ५१५ रुपयांसह दिवसभराच्या उच्चांकावर पोहचला होता. शेअरबाजार बंद होईपर्यंत कंपनीचे शेअर किरकोळ उसळीसह बंद झाला होता.

तीन दिवसात किती कमाई

सलग तीन कामकाजाच्या दिवसात उसळीने कंपनीची व्हॅल्युएशनमध्ये वाढ पाहायला मिळाली. आकड्यांना पाहायला गेले तर २० जानेवारी रोजी कंपनीचे मार्केट कॅप ५४,६०८.९८ कोटी रुपयांवर आले होते. ज्यात २३ जानेवारी रोजी वाढ पाहायला मिळाली आणि शेअर बाजार बंद होईपर्यंत कंपनीचे व्हॅल्युएशन ५५,६७५.०५ कोटी रुपयांवर आले आहे. याचा अर्थ तीन दिवस कंपनीची व्हॅल्युएशनमध्ये १,०६६.०७ कोटी रुपयांची वाढ पाहायला मिळाली.

सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण

खास बाब म्हणजे शेअर बाजारात या कामकाजाच्या दिवसात सेन्सेक्स आणि निफ्टीच्या निर्देशांकात मोठी घसरण पाहायला मिळाली. आकड्यांकडे पाहाताना २० जानेवारी रोजी सेन्सेक्स८२,१८०.४७ अंशांवर दिसत होता. जो २३ जानेवारी रोजी ८१,५३७.७० अंकावर घसरुन बंद झाला. याचा अर्थ या दरम्यान सेन्सेक्समध्ये ०.७८ टक्के घसरण पाहायला मिळाली. जर निफ्टीचा निर्देशांक २० जानेवारी रोजी २५,२३२.५० अंकांवर होता, जो २३ जानेवारी रोजी ०.७३ टक्के घसरुन २५,०४८.६५ अंशांवर येऊन बंद झाला.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.