ग्लोबल ब्रँडच्या स्पर्धेत पतंजलीचे बिझनस मॉडेल कसे बनले सुपरहिट ?
‘रिसर्च कॉमन्स’ मध्ये अलिकडे प्रकाशित झालेल्या अहवालातून हे सिद्ध होते की जेव्हा एखादा व्यवसाय त्याच्या सांस्कृतिक ओळखीशी आणि राष्ट्रीय भावनेशी जोडला जातो तेव्हा तो अधिक टिकाऊ होतो. पतंजली इमर्जन्सी अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे उद्घाटन हे या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

देशात कोणत्याही मोठ्या ब्रँड वा कंपनीचा विषय निघतो तर नेहमीच विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नाव तोंडावर येते. गेल्या काही वर्षात मात्र एका देशी ब्रँडचे नाव गाजत आहे. या देशी कंपनी परदेशी कंपन्यांना आव्हान दिले आहे. भारतीय बाजारातील स्थिती बदलली आहे. ते नाव आहे पतंजली असे आहे. याच मालिकेत नवा अध्याय जोडला गेला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी पतंजली योगपीठद्वारा संचालित इमर्जन्सी तसेच क्रिटीकल केअर हॉस्पिटलचे उद्घाटन केले आहे. हे केवळ हॉस्पिटलनसून जगातले पहिले असे केंद्र आहे जेथे योग, आयुर्वेद आणि आधुनिक उपचार ( मॉडर्न मेडिसिन )यांचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. हे केवळ आरोग्य केंद्राचे उद्घाटन नसून रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी अनेक वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाचा विजय आहे.एक छोटीशी सुरुवात आज एक आर्थिक आणि सांस्कृतिक आंदोलन बनले आहे.
स्वदेशीचा डंका
आज पाश्चात्य पद्धती आणि उत्पादनांनी बाजार भरलेला आहे. अशा पतंजलीने हे सिद्ध केले की जर मुळापासून जोडले गेले तर यश नक्कीच मिळते. ‘रिसर्च गेट’ (ResearchGate) मध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार पतंजलीचे यशाचे रहस्य त्याच्या अनोख्या रणनीतीत लपलेले आहे.जेथे मोठ-मोठ्या परदेशी कंपन्या केवळ नफ्यासाठी आणि बाजाराचा कल पाहतात, तेथे पतंजलीने भारतीय ग्राहकांनी नस ओळखली आहे.
भारतीय मनाला आजही परंपरांवर विश्वास करते. पतंजलीने हर्बल टुथपेस्ट, तूप आणि स्कीनकेअर सारखी उत्पादनांद्वारे प्राचीन ज्ञानला आधुनिक पॅकेजिंगमध्ये सादर केले आहे. यामुळे केवळ नवीन पिढीलाच नव्हे तर नव्या पिढीला देखील पतंजलीने त्यांच्या उत्पादनांकडे आकर्षित केले आहे.हे मॉडेल सांगते की आधुनिकता आणि परंपरा एक मेकांच्या विरोधात नाही तर एकमेकांना पुरक होऊ शकतात.
आत्मनिर्भरता.. केवळ नारा नाही,सत्य
नेहमी आपण ‘आत्मनिर्भर भारत’ च्या गोष्टी ऐकत असतो, परंतू पतंजलीने यास आपल्या बिझनस मॉडेलचा पाया रचला आहे ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट’ च्या एका केस स्टडीच्या मते,पतंजलीचा संपूर्ण ढाचा स्वदेशीच्या सिद्धांतावर टिकला आहे. ही कंपनी त्यांच्या उत्पादनासाठी परदेशातून कच्चा माल आणत नाही तर स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करते.
त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडतो. कारण मधले दलाल हटले गेल्याने माल देशाच्या आतच प्रोसेस होतो, खर्च कमी येतो.त्यामुळे पतंजलीची उत्पादने इतर कोणत्याही मल्टीनॅशनल ब्रँडपेक्षा स्वस्त मिळतात. यामुळे केवळ परदेशी आयातीवरील आपले अवलंबित्व कमी झाले आहेच, शिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य भाव मिळत आहे.
नफ्याच्या ऐवजी राष्ट्र निर्मितीचा विचार
पतंजलीने पुरवठा साखळी पासून मार्केटिंग पर्यंत प्रत्येक जागी नाविण्यता म्हणजे इनोव्हेशनचा वापर केला आहे. खाद्य प्रसंस्करण असो वा शिक्षणाचे क्षेत्र असो वा नवे वर्ल्ड-क्लास हॉस्पिटल, प्रत्येक जागी एक व्यापक दृष्टीकोन दिसत आहे.
