AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षकच बनला भक्षक, कपल बसलेलं असताना पोलीस आला अन्…, धक्कादायक घटना समोर

एका अल्पवयीन मुलीची पोलीस कर्मचाऱ्यानेच छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेमुळे चंद्रपूर पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली आहे.

रक्षकच बनला भक्षक, कपल बसलेलं असताना पोलीस आला अन्..., धक्कादायक घटना समोर
प्रेयसीला भेटायला गेला अन् जीव गमावला
| Edited By: | Updated on: Jul 04, 2023 | 4:18 PM
Share

चंद्रपूर : पोलिसांचं आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे खूप मोठं योगदान असतं. पोलीस आपलं संरक्षण करतात. समाजातील वाईट घटक आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी दिवसरात्र मेहनत करतात. घराघरातील महिला आणि मुलींचं संरक्षण करतात. त्यामुळेच तर महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशासह जगभरात नावाजलं आहे. त्यांच्या कतृत्वाची ख्याती सर्वत्र आहे. पण असं असताना काही विकृत पोलीस कर्मचाऱ्यांना याचं भान नसतं. त्यामुळे ते पोलीस वेशाला काळीमा फासणारं कृत्य करतात. पोलीस खात्याची बदनामी होईल किंवा पोलिसांची प्रतिमा मलीन होईल असं कृत्य करतात. चंद्रपुरात हा असा प्रकार घडला आहे. पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेचे शरमेनं मान खाली घालणारं कृत्य केलं आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. एक जबाबदार पोलीस कर्मचारी असं कसू वागू शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

चंद्रपुरात दोन दिवसांपूर्वी रविवारी संबंधित घटना घडली. रविवारची सुट्टी असल्याने दोन मुला-मुलींचं जोडपं बाईकवर मामला परिसरात फिरण्यासाठी गेलं होतं. त्यांनी रस्त्याच्या कडेला दोन दुचाकी लावल्या होत्या आणि त्यावर ते बसले होते. ते आपापल्या गप्पांमध्ये रंगले होते. या दरम्यान मामला परिसराच्या पुढे असलेल्या जंगलाच्या रस्त्यावरून एक दुचाकी जात होती. या दुचाकीवर तीन जण बसले होते. त्यांनी या मुलामुलींजवळ दुचाकी थांबवली. यावेळी ते विनाकारण मुलींसोबत आलेल्या मुलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले. त्यानंतर वाद वाढत गेला. या वादात हुल्लडबाजी करणाऱ्या तरूणांनी मुलींसोबत आलेल्या दोन्ही मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरोपींनी अल्पवयीन तरुणीची छेड काढला

विशेष म्हणजे याचवेळी घटनास्थळी एक चारचाकी कार आली. त्या कारमधून तरूण उतरले. हे तरूण त्या हुल्लडबाज तरूणांचेच मित्र होते. त्यांनी पीडित मुलांना मारहाण केली. तसेच मुलींना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. संबंधित घटनेमुळे मुली प्रचंड भेदरलेल्या होत्या. आपल्यासोबत काहीतरी वाईट होऊ शकतं, अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यामुळे मुलींनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मुली खूप रडत होत्या. पण हुल्लडबाज तरूणांना त्यांची दया आली नाही. आरोंपी तरूणांनी या मुलींना पकडण्याचा प्रयत्न केला.

नराधम तरूणांनी त्या मुलींना जबरदस्तीने गाडीत बसवलं. विशेष म्हणजे एका अल्पवयीन तरूणीचे दोघांनी हात धरले आणि गाडीत बसवले. यावेळी एका अल्पवयीन मुलीची आरोपी तरूणांनी छेड काढली. त्यानंतर त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत पोलीस ठाण्याच्या दिशेला गाडी नेली. आम्ही तुमचे भाऊ आहोत, असं पोलिसांना सांगा नाहीतर तुमच्यावर गुन्हा‌ दाखल करू, अशी धमकी आरोपी तरूणांनी दिली.

पोलीस कर्मचारी निलंबित

पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर अल्पवयीन तरूणीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तसेच तिने पाचही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेची अवस्था पाहून पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेत पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे आरोपींमधील मद्यधुंद असलेला एक तरूण हा पोलीस मुख्यालयात C-16 मध्ये कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी आहे, अशी माहिती समोर आली. या तरूणाचं सचिन बावणे असं नाव आहे. तसेच त्याचे इतर जोडीदार हे चव्हाण कॉलनीचे रहिवासी संतोष कुशवाहा, महेंद्रसिंग सनोतरा, शंकर पिल्ले आणि संतोष कानके असल्याचं निष्पन्न झालं.

जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच त्यानी या प्रकरणातील आरोपी पोलीस कर्मचारी सचिन बावणे याला तात्काळ निलंबित केलं आहे. या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पण संबंधित घटनेमुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.