
हरियाणातील प्रवीण हत्याकांड सध्या चर्चेत आहे. या हत्याकांडाची मास्टरमाइंड त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर सुरेश निघाले आहेत. 25 मार्च रोजी रात्री उशिरा प्रवीणच्या हत्येनंतर 26 मार्च रोजी प्रवीणच्या वडिलांनी रवीनाला प्रवीण कुठे आहे? असं विचारलं. तेव्हा माहीत नाही, असं रवीना म्हणाली. दोघांमध्ये काही तरी बिनसलं असेल असं प्रवीणचे वडील सुभाष यांना वाटलं. पण रवीना 26 मार्च रोजी शूटिंगच्या नावाने घरातून बाहेर पडली. घरातील लोकांनी प्रवीणचा मृतदेह सापडल्याची माहिती दिल्यानंतर ती 28 मार्च रोजी घरी आली होती.
रवीना घरी आली तेव्हा घरात मातम सुरू होतं. तिने सुद्धा रडण्याची भरपूर अॅक्टिंग केली. नवऱ्याचा मृत्यू झाल्याने आपल्यावर आभाळच कोसळल्याचं तिने कुटुंबातील लोकांना भासवलं. त्यानंतरही ती सासरीच राहिली. प्रवीणचा मृतदेह भिवानीच्या दिनोद रोडवरील नाल्याच्या जवळ सापडला. पोलिसांनी पोस्टमार्टेमनंतर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. कुटुंबाने अंतिम संस्कारही केले. 12 दिवस कुटुंबातील कुणीच तक्रार केली नाही. सर्व दु:खात होते. पण प्रवीणचा लहानभाऊ संदीप आणि चुलत भाऊ अमित यांना संशय वाटला. त्यांनी सर्वच सीसीटीव्ही शोधायला सुरुवात केली. त्यांनी स्वत: या प्रकरणाचा तपास सुरू केला.
वाचा: ७० वर्षांचा प्रियकर आणि ५० वर्षांची प्रेयसी… GRPने पकडताच जे कळालं, फुटला घाम
मध्ये मध्ये रवीना वहिनीला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने काही प्रश्न विचारत होते. 12 दिवसानंतर कुटुंबाने महत्त्वाच्या पुराव्यासह पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी 24 तासातच रवीना आणि सुरेशला अटक केली. दोघांचीही कसून चौकशी सुरू होताच त्यांनी पोपटासारखं बोलायला सुरुवात केली.
कुटुंबाची दिशाभूल
रवीना कुटुंबाची दिशाभूल करत होती. 25 मार्चच्या रात्री 3 वाजेपर्यंत प्रवीण घरातच होता असं तिने कुटुंबाला सांगितलं. घराच्या बाहेर बसून तो बीडी पीत होता असंही ती म्हणाली. त्यानंतर मी झोपी गेले. सकाळी उठले तर प्रवीण घरात नव्हता. कुठे तरी गेला होता. खरं तर रवीनाने रात्री 2 वाजेच्या आधी प्रवीणच्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेली होती. आणि 2.15 मिनिटापर्यंत सुरेश तिला घरी सोडवूनही निघाला होता.
काही तासाची चौकशी अन्…
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीना आणि सुरेश यांच्या विरोधात सबळ पुरावे होते. सीसीटीव्ही फुटेड, मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स सर्व गोष्टीतून सर्व काही स्पष्ट होत होतं. पोलिसांनी कसून चौकशी करताच दोघांनी खोटं बोलण्यास सुरुवात केली. पण आता सुटणं मुश्किल आहे हे लक्षात येताच त्यांनी गुन्हा कबूल केला.