चटके, हार्मोन्स वाढवण्याचे इंजेक्शन्स दिले… 200 वेळा अत्याचार, बांगलादेशी मुलीची सुटका; नायगावमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नायगावमध्ये 26 जुलै रोजी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने छापा टाकून एक सेक्स रॅकेट उद्धवस्त केलं होतं. या घटनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

चटके, हार्मोन्स वाढवण्याचे इंजेक्शन्स दिले... 200 वेळा अत्याचार, बांगलादेशी मुलीची सुटका; नायगावमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Naigaon Crime
| Updated on: Aug 11, 2025 | 4:06 PM

मुंबईनजीक असणाऱ्या वसईतील नायगाव पोलीस ठाणे हद्दीत अतिशय धक्कादायक घटना उघड झाली आहे. नायगाव मध्ये 26 जुलै रोजी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने छापा टाकून एक सेक्स रॅकेट उद्धवस्त केलं आहे. यावेळी एका 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर केलेल्या तपासातून धक्काकायक माहिती समोर आली आहे.

तपासातून धक्कादायक खुलासे

सेक्स रॅकेटमधील अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरोधत गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या पीडित मुलीला एका दलाल बांगलादेशी महिलेने बांगलादेश वरून कोलकाता येथे आणि नंतर मुंबईत आणले आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चटके दिले

या काळात तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चटके दिले, तिच्या शरीरातील हार्मोन्स वाढविण्यासाठी तिला इंजेक्शन दिले. एवढेच नाही तर तिचे बोगस आधारकार्ड बनवून तिचे वय 21 वर्षे दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

9 आरोपींना अटक करण्यात

आ घटनेतील पीडित मुलीला महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक याठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून तिच्यावर 200 पेक्षा जास्त वेळा अत्याचार करण्यात आल्याची ही माहिती उघड झाली आहे. त्यानंतर आता नायगाव पोलिसांनी पोस्को अंतर्गत बलात्कार असा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील 2 महिला आहेत, तर 3 जण हे महाराष्ट्रीयन दलाल आहेत.

पर राज्यातही तपास सुरू

महाराष्ट्रासह दुसऱ्या राज्यांमध्येही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांचे एक पथक यासाठी रवाना करण्यात आलेले आहे. यात आणखी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका अल्पवयीन मुलीवर एवढ्या अमानुष पद्धतीने तिच्यावर अत्याचार करून तिचा छळ केल्याच्या या घटनेने सर्वांच्याच अंगाचा थरकाप उडाला आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.