pune crime news : पुण्यात लपून-छपून मोबाईलमध्ये मुलींचं…, भणक लागताचं पोलिसांनी ताब्यात घेतला

pune crime news : महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या घराबाहेर घिरट्या घालून अंदाज घ्यायचा, त्यानंतर बाथरूमच्या खिडकीतून व्हिडीओ काढायचा अशा धक्कादायक प्रकार पुण्यात उजेडात आला आहे.

pune crime news : पुण्यात लपून-छपून मोबाईलमध्ये मुलींचं..., भणक लागताचं पोलिसांनी ताब्यात घेतला
PUNE CRIME NEWSImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 1:15 PM

विनय जगताप, पुणे : पुण्याच्या भोर (PUNE BHOR) तालुक्यातील नसरापूर गावात, सदनिकेमध्ये राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे चोरून मोबाईलवर चित्रीकरण (MOBILE VIDEO) करणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. उच्च शिक्षणासाठी भाड्याने राहत असलेल्या दोन तरुणींचे अंघोळ करीत असताना शेजारी राहणारा अल्पवयीन तरुण बाथरुमच्या खिडकीतून व्हिडीओ काढत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या तरुणींनी थेट पोलिस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली. नसरापूरच्या राजगड पोलीसांनी (NASRAPUR RAJGAD POLICE) तरुणीच्या तक्रारीवरुन त्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिस त्या मुलाची कसून चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे त्या मुलाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

नेमकं काय झालं

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एक धक्कादायक गोष्ट उजेडात आली आहे. काही तरुण मुली तिथं भाड्याने राहायला आहेत. त्या पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत. शेजारी राहणाऱ्या एक अल्पवयीनं मुलगा त्याच्या बाथरुमच्या खिडकीतून त्या मुलींचा व्हिडीओ काढायचा. ज्यावेळी त्या मुलीच्या लक्षात ही गोष्ट आली, त्यावेळी त्या मुलीने थेट पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या मुलाचा मोबाईल जप्त करुन त्याला ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक माहिती उजेडात आली

ज्यावेळी त्या अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्या मुलाने अशा पद्धतीचे यापुर्वी सुध्दा व्हिडीओ काढल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्या मुलाने गु्न्हा देखील मान्य केला आहे. त्या मुलाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्या मुलाच्या पालकांना देखील या प्रकारामुळे धक्का बसला आहे. पोलिस त्या मुलावरती काय कारवाई करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. लहान मुलं मोबाईलचा काय वापर करतात हे पालकांनी पाहणं गरजेचं आहे. सध्याचा पुण्यात जो काही प्रकार घडला आहे. तो भयानक आहे. त्यामुळं गरज असल्याचं मुलांना मोबाईल द्या अशी पालकांमध्ये चर्चा सुरु आहे.

Non Stop LIVE Update
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.