पुणे हादरवलं! क्लास वन अधिकाऱ्याने बायकोचा अंघोळीचा व्हिडीओ काढला, धक्कादायक कारण आलं समोर; पण नवरा अजूनही…

पुण्यातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. क्लास वन अधिकाऱ्याने पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी घरात कॅमेरे बसवले होते. पण नंतर त्याने हे व्हिडीओ पत्नीला दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. हे सगळं त्याने का केलं यामागचे कारण समोर आले आहे.

पुणे हादरवलं! क्लास वन अधिकाऱ्याने बायकोचा अंघोळीचा व्हिडीओ काढला, धक्कादायक कारण आलं समोर; पण नवरा अजूनही...
Crime news
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 23, 2025 | 12:43 PM

पुण्यात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरात कॅमेरे लावले होते. इतकेच नव्हे, तर त्याने घरातील बाथरूममध्येही कॅमेरे बसवले होते. या क्रूर पतीने पत्नीचा आंघोळीचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घृणास्पद घटना पुण्यात घडली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार कोणत्या अशिक्षित जोडप्यामध्ये घडला नाही. एका क्लास वन अधिकाऱ्याने आपल्या 30 वर्षीय पत्नीसोबत हे कृत्य केले आहे. जेव्हा पीडित पत्नीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, तेव्हा पोलीसही थक्क झाले. ही घटना खरोखरच धक्कादायक आहे.

पतीने बनवले आक्षेपार्ह व्हिडिओ

क्लास वन अधिकाऱ्याकडून संवेदनशीलतेची अपेक्षा केली जाते, कारण या पदापर्यंत पोहोचण्यासाठी उच्च शिक्षण आणि कठोर परिश्रमाची गरज असते. या संघर्षातून माणूस यशाच्या शिखरावर पोहोचतो. परंतु या घटनेत क्लास वन अधिकाऱ्यामध्ये संवेदनशीलता आणि समजूतदारपणाचा अभाव स्पष्ट दिसून येतो. त्याने आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले. तसेच पैसे मिळवण्यासाठी ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

वाचा: सुंदर मुलगी द्यायची ऑफर, हॉटेलच्या खोलीत लाळ गाळत पोहोचायचे लोक; मग वकील, पोलिस आणि…

लग्न कधी झाले?

या प्रकरणात पीडितेचे लग्न 2020 मध्ये आरोपी पतीसोबत झाले होते. लग्नानंतरपासूनच आरोपी पती सातत्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याच कारणामुळे त्याने घरात कॅमेरे बसवले होते. तसेच तो सतत तिला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. तिचा मानसिक छळही करत होता.

पत्नीच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ बनवले

आरोपी पती इथेच थांबला नाही. क्लास वन अधिकारी असलेल्या या व्यक्तीने पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरात कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यांद्वारे तो तिच्यावर लक्ष ठेवत होता. इतकेच नव्हे, तर त्याने बाथरूममध्येही कॅमेरे बसवले होते. त्याने पत्नीच्या आंघोळीचे आणि इतर खासगी क्षणांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्या माहेरहून कार आणि घराच्या हप्त्यांसाठी दीड लाख रुपये आणण्याची मागणी केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

अखेरीस, पीडितेने हा सर्व छळ सहन न करता थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने अंबेगांव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. या घटनेत पीडितेच्या पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये सासू, सासरे, नणंद आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.