
Pune Crime News : पुण्यातील बावधन येथील भोंदूबाबा प्रसाद तामदार याच्या कृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. तो भक्तांच्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करून मोबाईलचा अॅक्सेस घ्यायचा. तसेच एकदा अॅक्सेस घेतल्यानंतर भक्तांचे खासगी क्षण पाहण्याचं कुकृत्य हा भोंदू बाबा करायचा. आता पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, आता पोलीस त्याच्याकडे असलेल्या सर्वच इलेक्ट्रॉनिक उपकरणांची झडती घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या भोंदूबाबाकडे असलेल्या उपकरणांत हजारो अश्लील व्हिडीओ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भोंदूबाबा प्रसाद तामदार हा त्याच्या भक्तांच्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करायचा. एकदा अॅप डाऊनलोड झाल्यानंतर भक्तांचे खासगी क्षण पाहायचा. आता त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.भोंदूबाबा प्रसाद तामदार याची पोलीस कोठडी संपत आली आहे. मात्र पोलिसांनी या भोंदूबाबाच्या गळ्याभोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी भोंदू बाबाच्या आश्रमातून 3 मोबाईल 2 ipad,सोलोपोशे 0.5md च्या गोळ्यांचं मोकळं पॉकेट, प्रोव्हेनॉलच्या 9 गोळ्या,सिमकार्ड आणि pen drive आदी साहित्य जप्त केलं आहे.
भोंदू बाबाच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप्स असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यासाठीच पोलीस हे सर्व साहित्य न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. तिथे या उपकरणांत नेमका कोणता डाटा आहे याची माहिती घेतलीी जाणार आहे.दरम्यान भोंदूबाबाकडे इतर वैद्यकीय औषधही मिळाली आहेत. त्यांचा नेमका वापर काय आहे? याचीही तपासणी पोलीस करणार आहेत.
दरम्यान, या भोंदूबाबाच्या कुकृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर कोणावरही नागरिकांनी डोळे झाकून विश्वास टाकू नये. आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही अनोळखी अॅप डाऊनलोड रू नये, असे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे एखाद्या बाबाकडे दोन ते तीन मोबाईल कसे आले? तसेच बाबा असूनही त्याच्याकडे आयपॅड कसा? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. या भोंदूबाबावर कठोर कारवाई करावी? अशी मागणी केली जात आहे.