AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : पुण्यात मुळशी पॅटर्न, माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा मर्डर, आरोपींची नावे समोर

Vanraj Aandekar Murder Big Update : राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत.

Pune Crime : पुण्यात मुळशी पॅटर्न, माजी नगरसेवक वनराज आंदेकरांचा मर्डर, आरोपींची नावे समोर
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 02, 2024 | 12:47 AM
Share

गेल्या काही दिवसापासून पुणे शहर कायम चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच माजी नगरसेवकाच्या हत्येने पुणे हादरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  निर्माण झालं आहे. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमीच्या समोर वनराज आंदेकरांवकर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाहीतर आरोपींनी गोळ्या घालून झाल्यावर कोयत्यानेही त्यांच्या सपासप वार केले. या प्रकरणातील वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. वनराज आंदेकर यांच्या हल्ला करणाऱ्या आरोपींमध्ये गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम यांची नावे समोर आली आहेत. गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकर याचा जावई असल्याची माहिती समजत आहे.

नेमकं काय घडलं?

वनराज आंदेकर कार्यजवळ एकटेच उभे होते, त्यावेळी डोके तालीम चौकातील लाईट घालवण्यात आली. अंधाराचा आणि आंदेकर एकटे असल्याचा फायदा घेत आरोपी दुचाकीवर आले आणि पाच राऊंड फायर केले. गोळीबार झाल्यावर परिसरात मोठी खळबळ उडाली, आरोपींनी वनराज आंबेकर यांच्यावर गोळीबार केल्यावर कोयत्यानेही वार केले. काही क्षणात आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. वनराज आंदेकर यांनी केईम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे वनराज आंदेकर एकटेच होते. वनराज आंदेकर यांची हत्या करणारा संशियत आरोपी गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा जावई आहे. त्यामुळे आंदेकरांची हत्या घरगुती कारणामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. हत्येमागचे नेमके कारण आणि यामध्ये आणखी आरोपी आहेत का हे आता पोलीस तपासामध्ये समोर येईल. पुण्यातील नाना पेठेमध्ये आंदेकर टोळीचा दबदबा राहिला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला प्रमोद माळवदकर या गुंडाच्या हत्येमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. बंडू आंदेकर याच्याविरूद्ध 1985 पासून हत्या,हत्येचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र बाळगणेा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पुणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आसले होते. वनराज आंदेकर यांच्या आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेविका होत्या. त्यासोबतच वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक राहिले होते. तर वनराज आंदेकर पुण्याचे महापौरही राहिले होते.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना