Pune Crime : दौंडमध्ये चक्क शेतात सापडला मुदत संपलेल्या औषधांचा साठा

| Updated on: Jul 27, 2022 | 10:56 PM

दौंड तालुक्यातील मूळ गार या गावात शासनाचे नियम धाब्यावर बसवत शेतात उघड्यावर औषधांचा साठा फेकल्याचे उघडकीस आले आहे.

Pune Crime : दौंडमध्ये चक्क शेतात सापडला मुदत संपलेल्या औषधांचा साठा
दौंडमध्ये चक्क शेतात सापडला मुदत संपलेल्या औषधांचा साठा
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : दौंड तालुक्यातील मूळगार या गावातील चक्क शेतात मुदत संपलेल्या औषधांचा साठा (Medicine Stock) उघड्यावर आढळून आला आहे. मुदत बाह्य औषधे (Expired Medicine) नष्ट करण्याचे नियमच पायदळी तुडवत ही औषधे उघड्यावर आढळून आली आहेत. गावातील काही गावकऱ्यांनी ही घटना उघडकीस आणली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात मुदत संपण्याच्या अगोदरच्या टॅब्लेटची बंद पाकिटे देखील आढळून आली आहेत. या औषधांवर ‘नोट फॉर सेल’ असे लिहिले असल्याने हे औषधे शासनाच्या आरोग्य विभागा (Health Department)तील असल्याचे दिसून येत आहेत. मूळगार येथील दोन शेतकऱ्यांच्या बांधावर ही औषधं आढळून आली. ही औषधे पाहून नागरिकही अवाक झाले आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी

दौंड तालुक्यातील मूळ गार या गावात शासनाचे नियम धाब्यावर बसवत शेतात उघड्यावर औषधांचा साठा फेकल्याचे उघडकीस आले आहे. या औषधांमध्ये संपलेल्या औषधांसोबतच मुदत न संपलेली औषधांची बंद पाकिटे देखील आढळून आली आहेत. इतर वेळी सर्वसामान्य नागरिक औषधे घेण्यासाठी गेला तर त्याला मात्र औषधे संपले असल्याचे सांगीतले जात असते. माञ मुदत न संपलेली औषधे फेकून दिली जात असल्याने याबाबात नागरिकांकडून आरोग्य विभागाचे वाभाडे काढले जात आहे. याप्रकरणी तात्काळ लक्ष देऊन संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कोल्हापूरमध्ये दारुसाठा जप्त

औषधे असल्याचं भासवून चक्क गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर गांधीनगर जवळ कारवाई करत तब्बल 35 लाखाच्या दारूसह 45 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे. गोव्यातून बीडकडे अवैद्य मद्य वाहतूक केली जात होती. (A stock of expired medicines was found in a field in Daund)

हे सुद्धा वाचा