AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Theft : आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी स्वीकारला चोरीचा मार्ग, वसईत टोळी जेरबंद

या तिघांनी कट रचून 18 ते 19 जुलैच्या मध्यरात्री इको टेक रिसायकलिंग नावाच्या कंपनीचे लॉक तोडून आत प्रवेश केला. कंपनीतील जुने लॅपटॉप, जुने हार्ड डिस्क असा 12 लाख 86 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून फरार झाले होते.

Vasai Theft : आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी स्वीकारला चोरीचा मार्ग, वसईत टोळी जेरबंद
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी स्वीकारला चोरीचा मार्गImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 27, 2022 | 9:35 PM
Share

वसई : आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी वसईत मजुरीचे काम करणाऱ्या एका टोळीने चक्क चोरीचा मार्ग निवडला. पण पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या चोरी (Theft)चा भांडाफोड करण्यात वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. यात तीन जणांना अटक (Arrest) करून त्यांच्याकडून 12 लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. या अटक आरोपींवर वालीव पोलीस ठाण्यात भादवी कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मद मेहताब अन्वर अली (29), कारीमुद्दीन उर्फ छोटा जलालूद्दीन खान (24), इकरामुद्दीन जलालूद्दीन खान (32), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. यातील मोहम्मद हा नालासोपारा येथील तर अन्य दोघेजण जोगेश्वरीतील राहणारे असून, हे तिघेही मोलमजुरीचे काम करतात.

आठ दिवसांपूर्वी आरोपींनी केली होती चोरी

या तिघांनी कट रचून 18 ते 19 जुलैच्या मध्यरात्री इको टेक रिसायकलिंग नावाच्या कंपनीचे लॉक तोडून आत प्रवेश केला होता. कंपनीतील जुने लॅपटॉप, जुने हार्ड डिस्क असा 12 लाख 86 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून तिघे फरार झाले होते. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवलंदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, पोलीस नाईक सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, पोलीस अंमलदार गजानन गरीबे, सचिन मोहिते, सचिन खताल, जयवंत खंडावी यांचे स्वतंत्र पथक बनवून तांत्रिकदृष्ट्या तपास केला. अखेर या आरोपींना अटक करण्यात या पथकाला यश आले आहे.

आरोपींकडून चोरीचा माल हस्तगत

जे आरोपी आम्ही अटक केले ते मजुरीचे काम करणारे आहेत. आतापर्यंतच्या तपासात त्यांच्यावर दुसरे गुन्हे असल्याचे समोर आले नाही. पण आर्थिक टंचाईमुळे यांनी चोरीचा मार्ग निवडला असल्याचे तपासात समोर आले आहे. यांनी चोरलेला सर्व माल आम्ही जप्त केला असून, पुढचा तपास करीत आहोत असे तापासाधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांनी सांगितले. (Waliv police arrested a gang who stole from a company in Vasai)

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ