फ्रॉड लोन ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक, पुणे सायबर पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या

| Updated on: Sep 30, 2022 | 4:23 PM

या फ्रॉड लोन ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक झाली आहे. याचा थेट संबंध हे परदेशी लोकांपर्यंत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

फ्रॉड लोन ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक, पुणे सायबर पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
फ्रॉड लोन ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) बंगळुरुमध्ये फ्रॉड लोन ॲपचे कॉल सेंटर (Fraud Loan App Call Center) उध्वस्त केलं आहे. यात महाराष्ट्र आणि बंगळुरुमधून 18 आरोपींना अटक (Accused Arrested from Maharashtra and Bengaluru) करण्यात आली आहे. या फ्रॉड लोन ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक झाली आहे. याचा थेट संबंध हे परदेशी लोकांपर्यंत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

फसवणूक प्रकरणी एकूण 18 आरोपींना अटक

महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले स्वप्निल नागटिळक, श्रीकृष्ण गायकवाड, धीरज पुणेकर, प्रमोद रणसिंग, मुमताज कुमठे, सॅम्युअल कंदीयल पिता इब्राहिम, मोहम्मद मनियत पिता मोहिदू यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे. तर 11 आरोपींना बंगळुरुतून अटक करण्यात आलेली आहे.

कर्ज घेतलेल्या लोकांशी गैरवर्तन करायचे

सर्व आरोपी कॉल सेंटरमध्ये काम करणारे आहेत. हे लोन अँप कर्ज घेतलेल्या लोकांना कॉल करून अश्लील भाषा वापरून, शिवीगाळ करून तसेच धमकी देण्याचे मॅसेज कॉल करण्याचे काम करत होते.

हे सुद्धा वाचा

आरोपींकडे लोन ॲप कंपनीमार्फत कर्ज घेतलेल्या हजारो लोकांचा खाजगी डेटा त्यांच्याकडील जप्त डिजिटल डिव्हायसेस आणि कागदपत्रांमध्ये मिळून आला. सदर कॉल सेंटर 16 पेक्षा जास्त लोन अॅप्लिकेशन चालवत असल्याचं पोलिसांनी सागितलं आहे.

आरोपींकडून 70 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोबाईल हँडसेंट, सिमकार्ड असा एकूण 48, बँक खाते 56, संगणक आणि लॅपटॉप 1-1, 27 चेकबुक आणि पासबुक, इतर कंपनी सिम 30, डेबिट कार्ड 167, पेटीएम मशीन 1, पॅनकार्ड 15, आधारकार्ड 11, मतदार कार्ड 4, शिक्के 4 असा मुद्देमाल जप्त केला.

बंगळुरुहून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून दहा सिमकार्ड, हजेरी रजिस्टर, ओळखपत्र, लेटरहेड, नोंदवही, डीव्हीडी, पंधरा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्टर, स्विच मशीन, तीन इंटरनेट राऊटर, पीडितांचे मोबाईल क्रमांकाचे चार्ट, 50 इन्व्हाईस फाइल्स, दहा मोबाईल, फोन हेडफोन असा सायबर पोलिसांनी 70 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.