मॅट्रोमोनिअल साइटवरील ओळख भोवली ; गुंगीचे औषध देत तरुणीवर केला बलात्कार

आरोपीने पीडितेने लंगणाचे आमिष दाखवत तिला विविध ठिकाणी फिरायला घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीनं पीडितेला गुंगी येणारं औषध देत तिच्यावर अत्याचार केला . यानंतर पुन्हा मी तुझ्याशीच लग्न करणार आहे असे सांगत पीडित तरुणीशी सातत्याने शारीरिक संबंध ठेवले.

मॅट्रोमोनिअल साइटवरील ओळख भोवली ; गुंगीचे औषध देत तरुणीवर केला बलात्कार
कामावर उशिरा आली म्हणून अल्पवयीन नोकरानीला निर्वस्त्र करुन मारहाण
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 6:58 PM

पिंपरी-  शहरात गेलया काही दिवसांपासून मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. आयटी कंपनीतील तरुणीला स्वयंपाकाच्या निमिताने घरी बोलावून बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडित तरुणीनं पिंपरी पोलीस ठाण्यातआरोपीच्या विरोधात तक्रार केली आहे. सचिन बलदेव शर्मा असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा पंजाब राज्यातील पटीयाला येथील रहिवासी आहे. आरोपीनं 24 जानेवारी 2020 ते 1 जानेवारी 2021 दरम्यान पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे.

अशी घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी व आरोपीची मॅट्रोमोनिअल साइटवर ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत , त्यानंतर प्रेमात झाले. यानंतर आरोपीने पीडितेने लंगणाचे आमिष दाखवत तिला विविध ठिकाणी फिरायला घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीनं पीडितेला गुंगी येणारं औषध देत तिच्यावर अत्याचार केला . यानंतर पुन्हा मी तुझ्याशीच लग्न करणार आहे असे सांगत पीडित तरुणीशी सातत्याने शारीरिक संबंध ठेवले. मात्र आरोपीच्या मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून आरोपीवर फसवणुकीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करत आहेत.