Pimpri-Chinchwad crime | हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; अग्नीशामक दलाने वाचवाला जीव

| Updated on: Dec 27, 2021 | 4:42 PM

विद्युत डीपीवर अचानक तरुण चढला. मात्र असा अचानक तरुण डीपीवर चढल्याने रस्त्यावरील नागरिकांची घाबर गुंडी झाली. मात्र प्रसंगावधान राखत पोलिसांनी वीज वितरण कर्मचाऱ्याला घटनेची महिती दिली या माहितीची दाखल घेत तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.

Pimpri-Chinchwad crime | हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; अग्नीशामक दलाने वाचवाला जीव
Hinjewadi young attempt to suicid
Follow us on

पुणे – शहरातील हिंजवडी परिसरात विद्युत डीपीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हिंजवडीतील माण रस्त्यावर ही घटना घडली.मात्र अग्नीशामक दलाच्या जवानांमुळे तरुणाचा जीव वाचला असून , उपचारासाठी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित युवकाने नेमके कोणत्या करणामुळे हा आत्महत्येचा प्रयत्न केला हे अद्याप समोर आलेले नाही.

नेमकं काय घडलं

आज दुपारच्या सुमारास वर्दळी परिसरातील हिंजवडी माण रस्त्यावरील विद्युत डीपीवर अचानक तरुण चढला. मात्र असा अचानक तरुण डीपीवर चढल्याने रस्त्यावरील नागरिकांची घाबर गुंडी झाली. मात्र प्रसंगावधान राखत पोलिसांनी वीज वितरण कर्मचाऱ्याला घटनेची महिती दिली या माहितीची दाखल घेत तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. तोपर्यंत अग्नीशामक दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र तरीही विद्युत डीपीवर चढलेला तरुण खाली उतरण्याच्या मानसिकतेत नव्हता. तो तरुण डीपीवरून खाली उडी मारण्याच्या तयारीत असतानाच अग्नीशामक दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने त्याच्या पर्यंत पोहचत त्याला शिडीच्य मदतीने खाली घतले.

तरुण किरकोळ जखमी
या सर्व घटनेदरम्यान उष्ण विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने पीडित तरुणाला थोडे भाजले आहे. अग्नीशामक दलांनी त्याला खाली उतरावल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशामक दलाचे व विद्युत विभागाचे कर्मचारी चंद्रशेखर मतकर, कर्मचारी दत्ता खेडेकर, प्रविण पिंगळे, निखिलेश शिवगन यांच्या प्रयत्नामुळे तरुणांचा जीव वाचला आहे. त्याच्या या कामगिरीचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. या या घटनेत पीडित युवक नेमका कोणत्याही करणामुळे आत्महत्या करत होता हे अद्याप समोर आलेले नाही.

Bigg Boss Marathi 3 |लोकांची गर्दी, फटाक्यांची आतषबाजी! ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी घेऊन विशाल घरी परतला  

हरभरा पीक : पाण्याचे नियोजन हुकले तर सर्वकाही गमावले, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

Kanpur raid Piyush Jain: अब्जोंची कॅश बाळगणारे पियुष जैन आता तुरुंगात झोपत आहेत फरशीवर