AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातून मेडिकलचा विद्यार्थी बेपत्ता, माझ्या मुलाला शोधा, तन्मय वंगे यांच्या पालकांचे साकडे

गेल्यावर्षी सिंबायोसिसचे संस्थापक शां.ब. मुजुमदार यांच्या नातवावर बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग झाले होते. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. त्यानंतर तीन निवासी डॉक्टरांना निलंबित केले होते. तर ओर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉक्टर शिरिष बारटक्के यांची देखील बदली झाली होती.

पुण्यातून मेडिकलचा विद्यार्थी बेपत्ता, माझ्या मुलाला शोधा, तन्मय वंगे यांच्या पालकांचे साकडे
Medical student goes missing from Pune
| Updated on: Aug 01, 2026 | 10:21 AM
Share

पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकणारा तन्मय अजयकुमार वंगे हा विद्यार्थी हॉस्टेलमधून अचानक बेपत्ता झाला आहे. हॉस्टेलमधील सहकाऱ्यांनी त्याची रॅगिंग केल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून तन्मय निघून गेल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. तन्मय याला त्याच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरुन त्याला हिणवलं जात होते.त्याच्या सहकारी त्याची सारखी टिंगल करीत होते. त्याच्या जाचाला कंटाळूनच आपला मुलगा नाहीसा झाला आहे. त्याच्या गायब होण्याकडे वसतीगृहाचे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे हे देखील संशयास्पद असल्याचे त्याचे वडील अजयकुमारे वंगे यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

तन्मय अजयकुमारे वंगे हा कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगावचा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. गेल्या चौदा दिवसांपासून ते हॉस्टेल सोडून निघून गेला आहे. त्याचा मोबाईल फोन देखील स्विचऑफ असल्याने त्याचे पालक घाबरले असून अनेक पोलिस ठाण्याच्या पायऱ्या चढत आहेत. तन्मय या त्याच्या राहणीमान आणि ग्रामीण पार्श्वभूमीमुळे त्याचे वर्ग सहकारी उत्कर्ष सिंग,श्रेया यादव त्याला त्रास देत असल्याची तक्रार आपल्याला दिली होती. परंतू आपण सुरुवातीला त्रास होतो असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केल्याचे अजयकुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

माझा मुलाच्या हरवल्याची तक्रार देण्यासाठी आधी आपण बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो. परंतू त्यांनी तक्रार घेतली नाही. त्यांनी मुलगा शेवटचा जेथे दिसला होता, त्या पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला आपल्याला दिला. ऐकीव माहितीनुसार माझा मुलगा शेवटी खराडी येथील मित्र हर्षवर्धन चव्हाण याच्या खोलीवरती शेवटचा दिसल्याचे आपल्याला समजले. त्यानंतर खराडी पोलिस ठाण्यात २० जुलै रोजी मिसिंग तक्रार दिल्याचे तक्रारदार अजयकुमार वंगे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

लोणीकंद रेल्वे स्टेशननंतर  फोन बंद

१८ जुलै रोजी तन्मय नातेवाईकांकडे जातो. असं सांगून होस्टेलमधून निघाला. मात्र, त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. पुणे रेल्वे स्टेशनवर तो सोलापुरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मात्र लोणीकंद रेल्वे स्टेशननंतर त्याचा फोन बंद झाला आहे. त्यानंतर २१ आणि २३ जुलैला त्याच्या मोबाईलमधील इंटरनेट पुन्हा सुरू झाल्याचे तपास करणाऱ्या पोलीसांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. बी. जे. मेडिकल कॉलेजकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

माहिती दिली जात नाही

मात्र, त्या चौकशीत काय आढळलं आहे याची माहिती आपल्याला दिली जात नसल्याचे तन्मयच्या वडीलांचे म्हटले आहे. त्याचबरोबर इतरही अनेक पालकांनी त्यांच्या मुलांना बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा त्रास होत असल्याची तक्रार असल्याचे तन्मय याच्या वडीलांनी म्हटले आहे. तन्मय निघून गेल्याने त्याचे आई वडील तणावात असून त्याच्या आईला रुग्णालयात भरती करावे लागले आहे. पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवर रॅगिंगचे प्रकार नेहमीच घडत असतात. गेल्यावर्षी देखील बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तीन निवासी डॉक्टरांना अन्य एका निवासी डॉक्टरचे रॅगिंग केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप