जप्त केलेल्या वाहनाच्या इंजिन आणि बॅटरीला पाय फुटले? जुन्नरच्या ‘त्या’ घटनेवर पोलीस-महसूल विभाग गप्प

| Updated on: Aug 07, 2021 | 5:05 PM

अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एका गाडीला पोलिसांनी पकडलं. त्या गाडीला जप्त केलं. या गाडीला नंबर प्लेटच नव्हती. त्यामुळे ही गाडी चोरीची आहे की आणखी दुसरं काही याचा तपास अजून सुरुच होता. याबाबतची खरी माहिती येण्याआधीच विचित्र घटना घडली,

जप्त केलेल्या वाहनाच्या इंजिन आणि बॅटरीला पाय फुटले? जुन्नरच्या त्या घटनेवर पोलीस-महसूल विभाग गप्प
जप्त केलेल्या वाहनाच्या इंजिन आणि बॅटरीला पाय फुटले? जुन्नरच्या 'त्या' घटनेवर पोलीस-महसूल विभाग गप्प
Follow us on

जयवंत शिरतर, टीव्ही 9 मराठी, जुन्नर (पुणे) : अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एका गाडीला पोलिसांनी पकडलं. त्या गाडीला जप्त केलं. या गाडीला नंबर प्लेटच नव्हती. त्यामुळे ही गाडी चोरीची आहे की आणखी दुसरं काही याचा तपास अजून सुरुच होता. मात्र, पोलिसांनी गाडी जिथे उभी केली होती तिथून त्या गाडीचे इंजिन आणि बॅटरी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे एका पोलीस स्टेशनच्या पाठीमागे ही गाडी उभी करण्यात आली होती. पण चोरांची इतकी हिंमत की पोलीस स्टेशनच्या पाठीमागे उभ्या असलेल्या गाडीचे इंजित आणि बॅटरी पळवून नेले. या प्रकरणावरुन आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

प्रशासनाकडून प्रतिक्रिया देण्यास नकार

संबंधित घटना ही पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. बेल्हे पोलीस स्टेशन परिसरात जप्त केलेल्या ढंपर गाडीचे इंजिन आणि बॅटरी चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणावर पोलीस आणि महसूल विभाग यांच्यापैकी कुणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.

जप्त केलेल्या वाहनाचे इंजिन अचानक गायब

बेल्हे येथील महसूल प्रशासनाने काही दिवसांपूर्वी अवैध माती वाहतूक करणाऱ्या नंबर प्लेट नसलेला “हायवा (ढंपर)” पकडला होता. स्थानिक महसूल खात्याने पंचनामा करुन त्या वाहनाची रवानगी बेल्हे पोलीस ठाण्याच्या इमारतीमागे केली होती. तिथे संबंधित वाहन काही दिवसांपासून उभं होतं. पण आता या वाहनाचे इंजिन आणि बॅटरी अचानक गायब झाले आहेत. या वाहनाच्या इंजिन आणि बॅटरीला पाय फुटले की काय? असा सवाल आता स्थानिकांकडून करण्यात येतोय.

पोलीस भूमिका मांडतील का?

विशेष म्हणजे पोलीस आणि महसूल विभाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी जबाबदारी झटकली आहे. तसेच त्यांनी प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला आहे. याशिवाय जप्त केलेल्या वाहनाचे पार्ट अशाप्रकारे चोरीला जात असतील तर मालकाने नेमकी तक्रार कुठे करावी? असाही सवाल आता उपस्थित केला जातोय. या प्रकरणाचा उलगडा होणं गरजेचं आहे. कारण गाडी मालकाने पोलिसांना हाताशी धरुन गाडीचे इंजिन आणि बॅटरी चोरुन नेली, अशीदेखील चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.

हेही वाचा :

औरंगाबादेत वर्दीतल्या पोलीस निरीक्षकाची दादागिरी, भर रस्त्यात रिक्षाचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ-मारहाण, इतका माज येतो कुठून?

आईचा राग, धारदार शस्त्राने हल्ला, जन्मदाती जमिनीवर धारातीर्थ, रक्तबंबाळ वृद्ध मातेचा तडफडून मृत्यू, सातारा हादरलं !