AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईचा राग, धारदार शस्त्राने हल्ला, जन्मदाती जमिनीवर धारातीर्थ, रक्तबंबाळ वृद्ध मातेचा तडफडून मृत्यू, सातारा हादरलं !

साताऱ्यात एक भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे.

आईचा राग, धारदार शस्त्राने हल्ला, जन्मदाती जमिनीवर धारातीर्थ, रक्तबंबाळ वृद्ध मातेचा तडफडून मृत्यू, सातारा हादरलं !
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 2:41 PM
Share

सातारा : साताऱ्यात एक भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे. एका तरुणाने आईचा राग आला म्हणून चक्क तिच्यावर धारधार शस्त्राने हत्या केली आहे. विशेष म्हणजे ज्या आईला उतारवयात लेकाच्या आधाराची गरज होती त्याच वयात तिच्या मुलाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन तिला जमिनीवर धारतीर्थ पाडलं. आई मदतीसाठी जगण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेतही आक्रोश करत राहिली. पण अखेर तिची प्राणज्योत मालवली. तिचा संघर्ष संपला.

‘मुलगा आपल्या आईसोबत इतक्या निघृणपणे कंस वागू शकतो?’

संबंधित घटना ही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर बसस्थानक परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलगा आपल्या आईसोबत इतक्या निघृणपणे कंस वागू शकतो? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. काही नागरीक निर्दयी मुलावर टीकाही करताना दिसत आहेत. हल्लेखोर मुलाचं नाव शहाजी पवार असं आहे. तर मृतक 65 वर्षीय आईचं नाव सुलाबाई पवार असं आहे.

आईचा राग आल्याने हत्या

आई आपल्यावर ओरडणं ही एक सर्वसामान्य बाब आहे. तसेच उतारवयात माणूस चिडचिड करतो. हे देखील तितकंच खरं आहे. पण तिच आपली एक परीक्षा असते. आपल्या जन्मदात्या आईने तिच्या वृद्धावस्तेथ किंवा जेव्हा आपण घराची जबाबदारी सांभाळतो तेव्हा एखादी चूक झाली तेव्हा आपल्यावर ओरडली तर निमूटपणे ऐकून घेणं हे अपेक्षित असतं. त्यालाच तर आईचा आदर करणं असं म्हणतात. पण शहाजी पवार या नराधमाने मागचापुढचा कोणताही विचार न करता आईची हत्या केली.

पोलिसांकडून तपास सुरु

आईचा खून केल्यानंतर घरात शांतता पसरली. अखेर आरोपी शहाजी याला आपल्या कृत्याची लाज वाटली. त्याला पश्चात्ताप झाला. त्याने प्रायश्चित्त म्हणून थेट पोलीस ठाण्यात जावून आपला गुन्हा कबूल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. तिथे त्याने आपण आपल्या आईचा रागाचा भरात खून केल्याचं सांगितलं. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या घरीदेखील जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, आरोपीने स्वत:च्या आईची हत्या का केली? याबाबतचं खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

हेही वाचा :

आई सतत दारुच्या नशेत असल्याचा राग, वसईत 18 वर्षांच्या मुलाकडून सख्ख्या आईची हत्या

आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला, ठाण्यात हत्येचा थरार, मुलाला अटक

कोयत्याने वार करत सावत्र आईची हत्या, पुण्यात 17 वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.