AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला, ठाण्यात हत्येचा थरार, मुलाला अटक

पैसे दिले नाहीत म्हणून आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून मुलाने निर्घृण खून केल्याची घटना घडल्याने सोमवारी मुंब्य्रातील रेतीबंदर परिसरात एकच खळबळ उडाली.

आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला, ठाण्यात हत्येचा थरार, मुलाला अटक
आईच्या हत्येप्रकरणी मुंब्रा येथे मुलाला अटक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 20, 2021 | 8:43 AM
Share

ठाणे : छातीत स्क्रू ड्रायव्हर (Screwdriver) खुपसून मुलाने आपल्या सख्ख्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पैसे देण्यावरुन झालेल्या वादातून मुलाने टोकाचं पाऊल उचललं. मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

पैशांवरुन मायलेकात खटके

पैसे दिले नाहीत म्हणून आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून मुलाने निर्घृण खून केल्याची घटना घडल्याने सोमवारी मुंब्य्रातील रेतीबंदर परिसरात एकच खळबळ उडाली. विशाल एलझेंडे हा अविवाहित युवक मुंब्रा येथे आपली आई उर्मिला एलझेंडे हिच्यासोबत राहत होता. विशाल जी काही कमाई करायचा, त्या पैशांची उधळपट्टी करायचा. त्यानंतर आईकडे सतत पैशांची मागणी करत राहायचा. त्यामुळे मायलेकात कायम खटके उडत असत.

नेमकं काय घडलं?

सोमवारी दुपारी देखील पैशांवरुन दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर राग अनावर झाल्याने विशालने जवळच पडलेला स्क्रू ड्रायव्हर आईच्या छातीत खुपसला. विशालने केलेला वार एवढा गंभीर होता की आई जागीच गतप्राण झाली.

मुंब्रा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी विशालला अटक केली. मयत उर्मिला एलझेंडे हिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे,अशी माहिती मुंब्रा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

कोल्हापुरात आईची हत्या, मुलाला फाशी

दरम्यान, आईचा खून करणाऱ्या मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच फाशीची शिक्षा सुनावली. 28 ऑगस्ट 2017 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. दारुसाठी पैसे न दिल्याने सुनील कुचकोरवी (Sunil Kuchkorvi) याने आईची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आईचे अवयव भाजून खाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी नराधम मुलाला बेड्या ठोकल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच फाशीची शिक्षा ठरली.

संबंधित बातम्या :

26 वर्षीय प्रेयसीसोबत प्रेमसंबंधात अडथळा, पुण्यात 19 वर्षीय तरुणाकडून आईची हत्या

आईची हत्या करुन अवयव भाजून खाल्ले, नराधम मुलाला फाशीची शिक्षा, कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा फाशी

कोयत्याने वार करत सावत्र आईची हत्या, पुण्यात 17 वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात

(Thane Mumbra son arrested for killing Mother by inserting Screwdriver in chest)

Follow Us
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती