26 वर्षीय प्रेयसीसोबत प्रेमसंबंधात अडथळा, पुण्यात 19 वर्षीय तरुणाकडून आईची हत्या

19 वर्षीय विशाल राम वंजारी याने 38 वर्षीय आई सुशीला राम वंजारीची हत्या केली (Pune boy killing mother with girlfriend)

26 वर्षीय प्रेयसीसोबत प्रेमसंबंधात अडथळा, पुण्यात 19 वर्षीय तरुणाकडून आईची हत्या
गर्लफ्रेण्डच्या मदतीने पुण्यात तरुणाकडून आईची हत्या

पुणे : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची 19 वर्षीय तरुणाने हत्या केली. हत्येसाठी तरुणाच्या 26 वर्षीय प्रेयसीनेही त्याला साथ दिल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रेमी युगुलाला बेड्या ठोकल्या. मायलेकाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime 19 years old boy arrested for killing mother with help of girlfriend)

सात वर्षांनी मोठ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध

19 वर्षीय विशाल राम वंजारी हा 38 वर्षीय आई सुशीला राम वंजारीसोबत पुण्यात राहत होता. हवेली परिसरातील वढू खुर्दमधल्या माने वस्तीत वंजारी मायलेक राहत होते. विशालचे त्याच्यापेक्षा वयाने सात वर्षांनी मोठ्या असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. सुशीला वंजारी यांचा मुलाच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. त्यातच घरातून पैसे चोरल्याचा आळ आईने घेतल्यामुळे विशाल नाराज होता.

हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

विशालने प्रेयसी नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे हिच्या मदतीने आईचा खून केला. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न त्याने केला. जालन्यातील एका व्यक्तीसोबत कर्जावरुन वादावादी झाल्याचं सांगत विशालने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

मुलासोबत त्याच्या प्रेयसीलाही बेड्या

पोलिसांनी अधिक तपास केला असता विशालवर त्यांचा संशय बळावला. अखेर धारदार शस्त्राने भोसकून आईची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विशाल राम वंजारी आणि नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे यांना पोलिसांनी गजाआड केले.

पनवेलमध्ये लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीसह आईची हत्या

लग्नाला नकार दिल्यामुळे मुलीच्या कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना पनवेलमध्ये घडली होती. या हल्ल्यात मुलगी आणि तिच्या आईचा मृत्यू झाला. याशिवाय मुलीचे वडीलही जखमी झाले. पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे गाव हादरले.

संबंधित बातम्या :

मुंबईत 14 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार, बॉक्सिंग प्रशिक्षक गजाआड

पालघरमध्ये पत्नीची चाकूने भोसकून हत्या, पतीची ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या

(Pune Crime 19 years old boy arrested for killing mother with help of girlfriend)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI