पनवेलमध्ये दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यानं मुलीसह आईची हत्या

पनवेलमध्ये दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यानं मुलीसह आईची हत्या
प्रतिकात्मक फोटो

लग्नाला नकार दिल्यामुळे एका आरोपीने मुलीच्या कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी आणि तिच्या आईचा मृत्यू झाला.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 20, 2021 | 12:58 AM

नवी मुंबई : लग्नाला नकार दिल्यामुळे एका आरोपीने मुलीच्या कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी आणि तिच्या आईचा मृत्यू झाला. याशिवाय मुलीचे वडीलही जखमी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे गाव हादरले असून परिसरात दहशत पसरली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच फरार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जातोय (Murder of daughter and mother in Panvel after rejecting for marriage).

पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दापोली येथील एका चाळीत बलखंडे कुटुंब राहत होते. त्यांच्या बाजूला संबंधित आरोपी राहत होता. तो डंपर चालक होता. हे सर्वजण मराठावाड्यातून असल्याने एकमेकांना ओळखत होते. आरोपीचं आधी एक लग्न झालं होतं. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याला दुसरं लग्न करायचं होतं. त्याने पीडित मुलगी सुजाता (वय 18) हिला मागणी घातली होती. मात्र, सुजाताच्या आई वडिलांनी त्याला वारंवार नकार दिला होता. असं असतानाही आरोपीने या कुटुंबीयांच्या मागे तकादा लावला होता.

आरोपीने आज (19 फेब्रुवारी) सकाळी घरी जाऊन परत लग्नाच्या विषय छेडला. त्यावेळी मुलीची आई सुरेखा आणि वडील सिद्धार्थ यांनी पुन्हा नकार दिला. नकार दिल्याच्या रागातून आरोपीने धारधार शस्त्राने त्यांच्यावर आणि पीडित मुलगी सुजातावर सपासप वार केले. या घटनेनंतर आई सुरेखा आणि सुजाता यांना गंभीर जखमा झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वडील सिद्धार्थ किरकोळ जखमी आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला.

या घटनेची माहिती मिळताच पनवेलचे डीसीपी शिवराज पाटील, एसीपी नितीन भोसले पाटील, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहचले. स्थानिक नागरिकांकडून माहिती घेऊन पसार झालेल्या हत्याऱ्याला पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आलेय. सदर घटनेचा तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

महिनाभरापूर्वी लग्न, विवाहबाह्य संबंधांचा संशय, दोन नववधूंची पतीकडून हत्या

तीन मर्डर करेन, हिंमत असेल तर पकडून दाखवा, हकालपट्टी होताच शिपायाची पोलिसांना धमकी

धक्कादायक… व्यसनीपणाला कंटाळून आई आणि मुलानेच दिली बापाच्या खुनाची सुपारी

व्हिडीओ पाहा :

Murder of daughter and mother in Panvel after rejecting for marriage

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें