VIDEO : औरंगाबादेत वर्दीतल्या पोलीस निरीक्षकाची दादागिरी, भर रस्त्यात रिक्षाचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ-मारहाण, इतका माज येतो कुठून?

औरंगाबादेत साहायक पोलीस निरीक्षक राजेश मायेकर यांनी एका रिक्षाचालकाला भर रस्त्यात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO : औरंगाबादेत वर्दीतल्या पोलीस निरीक्षकाची दादागिरी, भर रस्त्यात रिक्षाचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ-मारहाण, इतका माज येतो कुठून?
औरंगाबादेत वर्दितल्या पोलीस निरीक्षकाची दादागिरी


औरंगाबाद : औरंगाबादेत साहायक पोलीस निरीक्षक राजेश मायेकर यांनी एका रिक्षाचालकाला भर रस्त्यात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राजेश मायेकर रिक्षा चालकावर दादागिरी करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसेच सहायक पोलीस निरीक्षकाच्या तोंडातून इतक्या घाणेरड्या आणि अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या जाताना दिसत आहे जे ऐकून आपल्या खरंच कानठल्या बसतील. एखाद्या गुंड्यालाही जमणार नाही इतक्या खालच्या पातळीच्या भाषेत राजेश मायेकर रिक्षाचालकाला बोलताना दिसत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

नेमकं काय घडलं?

सहायक पोलीस निरीक्षक राजेश मायेकर त्यांच्या चारचाकी गाडीने रस्त्याने जात असताना काही कारणास्तव त्यांनी गाडीचा ब्रेक दाबला. यावेळी त्यांच्या पाठीमागे असलेल्या रिक्षाचा कारला धक्का लागला. याच गोष्टीचा राग राजेश मायेकर यांना आला. त्यांनी गाडीतून उतरुन भर रस्त्यात रिक्षाचालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्या रिक्षाचालकाच्या रिक्षाची चावी काढून घेतली.

रिक्षाचालकाची हात जोडून याचना

यावेळी रिक्षाचालक माफी मागत होता. तसेच गाडीचं झालेल्या नुकसानीची भरपाई देतो, असंही तो तरुण म्हणत होता. पण निगरगट्ट पोलीस निरीक्षक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते रिक्षाचालकाला धक्काबुक्की करत शिवीगाळ करु लागले. रिक्षाचालक रिक्षाच्या चावीसाठी अक्षरश: याचना करत होता. पण निर्दयी पोलीस निरीक्षकाला पाझर फुटला नाही. ते प्रचंड घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करत राहीले.

पोलीस इतक्या निष्ठूरपणे कसं वागू शकतात?

संबंधित घटना घडत असताना बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी दाखल झाली होती. बघणाऱ्यांपैकी काली नागरिकांनी या घटनेला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या व्हिडीओवर राज्यभरातून संतापाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. रिक्षाचालक हात जोडून विनंती करत असताना खाकी वर्दीतला पोलीस इतका निष्ठूरपणे कसा वागू शकतो? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे साहायक पोलीस निरीक्षक राजेश मायेकर यांच्या दादागिरीमुळे औरंगाबाद पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

प्रेमविवाह केल्याचा राग, भावाकडून बहिणीचं खुरप्यानं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

आईचा राग, धारदार शस्त्राने हल्ला, जन्मदाती जमिनीवर धारातीर्थ, रक्तबंबाळ वृद्ध मातेचा तडफडून मृत्यू, सातारा हादरलं !

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI