पुण्यात काय सुरु आहे? आधी कोर्टाबाहेर गोळीबार, दौंडमध्ये रात्रीचे सर्च ऑपरेशन सुरु, गेल्या तीन तासांपासून संपूर्ण परिसराची घेराबंदी

पुण्यात आज आधी पुणे कोर्टाबाहेर गोळीबार झाला. आता दौंडमध्ये रात्रीचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. या प्रकरणातील दोन आरोपी सापडले, पण 1 पळाला आहे. त्याच्या शोधासाठी शेतातून गेल्या 3 तासांपासून थरारक सर्च ऑपरेशन सुरु आहे.

पुण्यात काय सुरु आहे? आधी कोर्टाबाहेर गोळीबार, दौंडमध्ये रात्रीचे सर्च ऑपरेशन सुरु, गेल्या तीन तासांपासून संपूर्ण परिसराची घेराबंदी
pune court firing case
| Updated on: Nov 25, 2026 | 10:52 PM

रंजीत जाधव, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी :  गुंडांनी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार करुन पुणे हादरवून सोडलं असताना रात्री आता दौंडमध्ये या घटनेच्या आरोपींना पकडण्यासाठी काळोखात पोलिस आणि आरोपींचा थरार पाठलाग सुरु आहे. त्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्याही ठोकल्या होत्या. पण एका आरोपीने पोलिसांना गुंगारा दिल आणि तो शेतातील वाटेने पसार झाला. त्यामुळे गेले दोन ते तीन तास त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांचं दाट शेतीत सर्च ऑपरेशन सुरु आहे.

पुण्यातील गुन्हेगारीचा कळसाध्यय झाला आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. बुधवारी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर ४ बाहेर भरदुपारी गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याने कोर्टाच्या आवारातच कायदा आणि सुव्यवस्थेवर धिंडवडे निघाले असतानाच आता पुण्याच्या जवळील दौंड येथे रात्रीच्या अंधारात पोलिस दोघा आरोपींना पकडण्यास गेले असता त्यापैकी एक आरोपीने गुंगारा दिल्याने त्याला शोधण्यासाठी दोन तास पुणे पोलिसांचे दाट शेतातून सर्च ऑपरेशन सुरु झाले आहे.

Loading...

कोर्टाबाहेर मंदार किवळेवर गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करून आरोपी पसार झाले आहेत. दुपारी 1 वाजता पुणे हादरवून हल्लेखोर दौंडच्या दिशेने पसार झाले. पुणे पोलिसांनी त्यांचा माग काढला. त्यातील दोन आरोपींच्या मुसक्या आळवल्या गेल्या. पण एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. आता त्याच्या शोधासाठी दौंड तालुक्यातील बेटवाडीमध्ये रात्रीच्या काळोखात पोलिस विरुद्ध आरोपी असा पाठलाग सुरू आहे.

हल्ल्यानंतर आरोपी बेटवाडीच्या दाट शेतीत लपल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे वाड्या-वस्त्यांना घेराव घातला. तब्बल 3 तासांपासून दाट शेती आणि रात्रीच्या काळोखात सर्च ऑपरेशन जारी आहे. तिसरा आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन अंधाराचा फायदा घेत शेतात पळून गेला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. दुचाकीवरून, टॉर्चच्या उजेडात, शेताच्या बांधावरून पोलिस आरोपींचा माग काढत आहेत.

आज दुपारी पुण्यातील मंदार किवळे नावाच्या तरुणावर ६ जणांच्या टोळीने पिस्तुलातून गोळीबार करीत कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या वर्षी कात्रजमधील जागेच्या वादातून झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने पाठलाग करून ३ संशयितांना ताब्यात घेतले असून जखमी तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us