प्रसूती होताना ओरडतेस का?, म्हणत गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, दौंडमधील संतापजनक घटना

| Updated on: Oct 17, 2021 | 4:05 PM

पुण्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक घटना समोर येतीय. प्रसुतीवेळी महिलेला त्रास होत असल्याने तिने आरडाओरड केली म्हणून डॉक्टरने गरोदर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात डॉक्टरविरोधात संताप व्यक्त केला जातोय.

प्रसूती होताना ओरडतेस का?, म्हणत गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, दौंडमधील संतापजनक घटना
गरोदर महिलेला डॉक्टरकडून मारहाण
Follow us on

दौंड (पुणे) :  पुण्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक घटना समोर येतीय. प्रसुतीवेळी महिलेला त्रास होत असल्याने तिने आरडाओरड केली म्हणून डॉक्टरने गरोदर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात डॉक्टरविरोधात संताप व्यक्त केला जातोय.

प्रसूती कळा येत असल्याने रुग्णालयात भरती झालेल्या एका महिलेस डॉक्टरकडूनच अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक दौंड तालुक्यातील यवत येथे घडलीय. याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा गोरख दळवी असे मारहाण झालेल्या गरोदर महिलेचे नाव असून त्यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डॉक्टरविरोधात कडक पावलं उचलत त्याला धडा योग्य दडा शिकवू, असं म्हटलं आहे.

नेमकी घटना काय?

प्रसूती कळा येत असल्याने महिला यवत येथील जयवंत हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी या महिलेस तोंडावर, डोक्यावर, हातावर, मांडीवर, ओठांवर चापटीने आणि बुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  ही मारहाण इतकी अमानुष होती की या मारहाणीमुळे पूजा दळवी यांच्या डोळ्याच्या खाली चेहऱ्यावर काळे-निळे रंगाच्या जखमा झाल्या आहेत.

कहर म्हणजे मारहाण करुन डॉक्टर महिलेला मी कसा बरोबर आहे, मला नेमकं कशामुळे मारावं लागलं, मारल्यामुळे तू ओरडायची कशी थांबली, हे निर्लजपणे सांगत होता. डॉक्टर खरं तर देव मानले जातात. पण या डॉक्टरने वैद्यकीय पेशाला काळीमा फासला आहे.

हे ही वाचा :

‘तेरी जुबान कतरना बहुज जरुरी है’, शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानं अमोल मिटकरींचा चंद्रकात पाटलांवर निशाणा

‘कोकणचा ढाण्या वाघ’, रामदास कदमांच्या समर्थनात ठाण्यात पोस्टरबाजी; नेत्यांचे फोटो पण शिवसेनेचा उल्लेख नाही!