‘कोकणचा ढाण्या वाघ’, रामदास कदमांच्या समर्थनात ठाण्यात पोस्टरबाजी; नेत्यांचे फोटो पण शिवसेनेचा उल्लेख नाही!

'कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन देतो बाप बापच असतो...' असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळत आहे. या बॅनरवर रामदास कदम यांचा मोठा फोटो लावण्यात आलाय. तर त्यांच्या फोटोमागे डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं चित्रही काढण्यात आलं आहे.

'कोकणचा ढाण्या वाघ', रामदास कदमांच्या समर्थनात ठाण्यात पोस्टरबाजी; नेत्यांचे फोटो पण शिवसेनेचा उल्लेख नाही!
रामदास कदमांच्या समर्थनात ठाण्यात बॅनरबाजी
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 3:19 PM

ठाणे : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरुन शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातूनच रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात नो एन्ट्री, अशा बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानंतर आता शिवसेनेतील अंतर्गत वाद बॅनरबाजीच्या रुपाने चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळतंय. रामदास कदम यांचा फोटो असलेला एक बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी चौकात लावण्यात आलाय. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, शिवसेनेचा उल्लेख नाहीत. इतकंच नाही तर या बॅनरवर एक मजकूरही लिहिण्यात आला आहे. (Banner waving in support of Shivsena leader Ramdas Kadam in Thane)

‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन देतो बाप बापच असतो…’ असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळत आहे. या बॅनरवर रामदास कदम यांचा मोठा फोटो लावण्यात आलाय. तर त्यांच्या फोटोमागे डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं चित्रही काढण्यात आलं आहे. रामदास कदम यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवरील मजकूर कुणाला उद्देशून आहे? कुणी कुणाची सुपारी दिली? अशी चर्चा आता ठाणे आणि परिसरात सुरु झाली आहे.

रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंना पत्र

रामदास कदम यांनी 6 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. अनिल परब यांच्यावरील आरोपासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरलं झाली होती. यासंदर्भात कदम यांनी त्यांची बाजू पत्राद्वारे मांडली आहे. त्यानंतर रामदास कदम यांना दसरा मेळाव्याला एन्ट्री नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा ष्णमुखानंद सभागृहात पार पडत आहे. रामदास कदम या मेळाव्याला हजर राहणार का याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं रामदास कदम यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कळवलं होतं.

उद्धव ठाकरेंना भेटून बाजू मांडणार

रामदास कदम कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपामुंळे नाराज आणि व्यथित असल्याची माहिती आहे. रामदास कदम यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बाजू मांडली आहे. पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा रामदास कदम यांनी पत्रात केला असल्याचं कळतंय. रामदास कदम यांनी आपल्या वेदना उद्धव ठाकरेंपुढे पत्राद्वारे मांडल्या आहेत. आठवडाभरात उद्धव ठाकरेंना व्यक्तिशः भेटून रामदास कदम आपल्या भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.

कथित ऑडिओ क्लिपचं नेमकं प्रकरण काय?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्याच एका नेत्यानं रसद पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसा गंभीर आरोप केलाय. खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचं नाव घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

इतर बातम्या :

अजित पवार यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली की बहिणीशी बेईमानी केली? किरीट सोमय्यांचा सवाल

पुणे, नाशिकनंतर आता राज ठाकरेंनी मुंबईकडे मोर्चा वळवला, भांडुपमध्ये मनसेचा मेळावा होणार

Banner waving in support of Shivsena leader Ramdas Kadam in Thane

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.