अजित पवार यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली की बहिणीशी बेईमानी केली? किरीट सोमय्यांचा सवाल

मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला आहे. यातील एक जरी कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिलंय.

अजित पवार यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली की बहिणीशी बेईमानी केली? किरीट सोमय्यांचा सवाल
किरीट सोमय्या, अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 2:52 PM

सोलापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांना सोमय्या यांनी थेट आव्हान दिलंय. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणीशी बेईमानी केली? असा सवाल सोमय्या यांनी केलाय. ते आज सोलापुरात बोलत होते. (Kirit Somaiya’s serious allegations against Ajit Pawar)

‘अजित पवार आणि मित्र परिवाराकडून फक्त चिल्लर सापडली, असं पवार म्हणाले. मी पवारांना विचारतो. शिवालिक व्हेन्चर्स लिमिटेड, इंडोकॉम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कोण आहे? या दोघांनी अजित पवारांना 100 कोटी रुपये किती वर्षापूर्वी दिले होते? त्याची अजित पवारांच्या बेनाई, नामी कंपन्यांमध्ये एन्ट्री लिहिलेली आहे. भविष्यात कधी अजित पवार आपल्या जमिनी विकणार, त्याचा अनसिक्योर अॅडव्हान्स हे 2008 च्या बुकमध्ये एन्ट्री झाली. परंतू त्यावर लिहिलं की यावर कोणतंही व्याज दिलं जाणार नाही. 100 कोटीची ती प्रॉपर्टी आज बाराशे कोटीची झालीय. त्यातील एक दमडी परत दिली का?’

हे शरद पवारांना मान्य आहे का?

संजय राऊतांनी 55 लाख रुपये अशा पद्धतीनं 2010 मध्ये घेतले होते. ईडीने शोधून काढल्यानंतर संजय राऊतांनी मागच्या दाराने ईडीचा माल परत केला. अजित पवार चोरीचा माल परत करणार का? आपण सांगता की दोन बिल्डरकडून पैसे मिळाले. ते दोन बिल्डर अजित पवारांचे पार्टनर आहेत का? अजित पवारांनी आयकर विभागाडी धाड सुरु झाल्यावर पहिल्या दिवशी विधान केलं की माझ्या बहिणी निता पाटील, विजया पाटील, मेहुणे मोहन पाटील यांच्या घरी धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाही. माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत की जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवारांच्या 70 बेनामी, नामी संपत्तीत, त्या कंपनीत अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे पार्टनर आहेत. मग अजित पवार तुम्ही बेईमानी महाराष्ट्रातील जनतेशी केली की बेईमानी आपल्या बहिणीशी केली? बहिणीच्या नावे संपत्ती, पार्टनशिप, कंपन्या आहेत. आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही, मग बहिणींच्या नावाने पण बेईमानी केली? ते शरद पवार यांना मान्य आहे का?

शरद पवारांसह पवार कुटुंबाला थेट आव्हान

माझं शरद पवारांना आव्हान आहे, की मी ही सगळी कागदपत्रे ईडी आणि आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार खात्यालाही पाठवणार. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला आहे. यातील एक जरी कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिलंय.

इतर बातम्या :

पुणे, नाशिकनंतर आता राज ठाकरेंनी मुंबईकडे मोर्चा वळवला, भांडुपमध्ये मनसेचा मेळावा होणार

पवारांचा भाजप नेत्याकडून एकेरी उल्लेख, राऊत म्हणतात, यांच्या डोक्याची चौकशी करा!

Kirit Somaiya’s serious allegations against Ajit Pawar

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.