कंपनीला गाडी लावतो, भाड्यावरील 250 गाड्या परस्पर गहाण, पुण्यात माजी उपसरपंचाला बेड्या

| Updated on: Nov 05, 2021 | 8:50 AM

माझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या, मी ती कंपनीत लावतो, असे सांगून महाभागाने नागरिकांना महागड्या गाड्या घेण्यास भाग पाडले. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या सुमारे 250 गाड्या परस्पर गहाण ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला

कंपनीला गाडी लावतो, भाड्यावरील 250 गाड्या परस्पर गहाण, पुण्यात माजी उपसरपंचाला बेड्या
पिंपरीत २५० जणांची फसवणूक
Follow us on

पिंपरी चिंचवड : गाडी विकत घ्या, मी ओळखीने कंपनीत लावतो, असं सांगत भाड्याने घेतलेल्या सुमारे 250 गाड्या परस्पर गहाण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा पुण्यातील माजी उपसरपंच आहे.

काय आहे प्रकरण?

माझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या, मी ती कंपनीत लावतो, असे सांगून महाभागाने नागरिकांना महागड्या गाड्या घेण्यास भाग पाडले. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या सुमारे 250 गाड्या परस्पर गहाण ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील साबळेवाडी येथे ही घटना घडली.

20 महागड्या गाड्या हस्तगत

माजी उपसरपंचाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटी 96 लाख रुपये किंमतीच्या 20 महागड्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. सागर मोहन साबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो साबळेवाडी गावात 2014 मध्ये उपसरपंच होता.

बनावट रेशनकार्ड आणि जन्म दाखले बनवणारे अटकेत

दुसरीकडे, बनावट रेशनकार्ड आणि जन्म दाखले बनवून देणाऱ्या दोघा जणांनाही भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. राहुल शिंदे आणि नितीन वहाळकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कासारवाडी परिसरात त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींनी अनेक सरकारी आणि खासगी कार्यालये, बँका यांमध्ये हे बनावट दाखले आणि बनावट शिक्के बनवल्याचे उघडकीस आले आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये गेमिंग अॅपचं व्यसन जडलं, स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी थेट गोवा गाठलं, वाचा नेमकं काय घडलं?

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! तीन वर्षांच्या लेकराने फटाका गिळला, अतिसाराने मृत्यू

सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पनवेलची महिला कॉन्स्टेबल गजाआड, वरिष्ठाच्या हत्येचा शिजणारा कटही उघड