VIDEO | उठाले रे बाबा! नो पार्किंगमधील स्कूटर सामानासकट उचलली, स्थळ आपलं नेहमीचंच-पुणे!

| Updated on: Mar 15, 2022 | 8:43 AM

पुणे शहरातील सुप्रसिद्ध लक्ष्मी रोडवर सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. पार्किंगच्या बाहेर दुचाकी लावून दोघे जण खरेदीसाठी गेले होते. तेवढ्यात वाहतूक पोलिसांची गाडी नो पार्किंग किंवा पार्किंगच्या पांढर्‍या पट्टीबाहेर लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी आली.

VIDEO | उठाले रे बाबा! नो पार्किंगमधील स्कूटर सामानासकट उचलली, स्थळ आपलं नेहमीचंच-पुणे!
पुण्यात सामानासह दुचाकी उचलली
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

पुणे : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) नो पार्किंगमध्ये (No Parking) उभ्या केलेल्या दुचाकींवर कारवाई केली. यावेळी एक दुचाकी सामानासह उचलल्याचं पाहायला मिळालं. आमच्या सामानाचं नुकसान झालं, आमची गाडी सोडा, असा आरडाओरडा दुचाकी मालकांनी केला. त्यानंतरही पोलीस गाडी सोडायला तयार नव्हते. मात्र या प्रकाराचं व्हिडीओ शूट होत असल्याचं समजल्यावर पोलिसांनी स्कूटर सोडल्याचा दावा केला जात आहे. स्कूटरवर ठेवलेल्या साहित्यासह गाडी उचलतानाचा व्हिडीओ (Bike Tow) समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

पुणे शहरातील सुप्रसिद्ध लक्ष्मी रोडवर सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. पार्किंगच्या बाहेर दुचाकी लावून दोघे जण खरेदीसाठी गेले होते. तेवढ्यात वाहतूक पोलिसांची गाडी नो पार्किंग किंवा पार्किंगच्या पांढर्‍या पट्टीबाहेर लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी आली.

स्कूटर उचलल्याचं पाहून दोघं धावले

दोघा जणांनी दुचाकीवर खरेदी केलेले साहित्य ठेवलं होतं. पोलिसांनी त्या साहित्यासह क्रेनच्या मदतीने दुचाकी उचलली. ते पाहून दोघं जण धावत आले आणि ‘आमच्या सामानाचं नुकसान झालं, आमची गाडी सोडा’ अशी विनंती केल्यावरही पोलीस ऐकायला तयार नव्हते.

व्हिडीओ व्हायरल

कारवाईचे रेकॉर्डिंग होत असल्याचं लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी गाडी सोडून दिली. स्कूटरवर ठेवलेल्या साहित्यासह गाडी उचलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पुण्यातील समर्थ वाहतूक पोलिस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला त्याच्या दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये उचलून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. सोशल मीडियावर याचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर जोरदार टीका झाली होती.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पुण्यात वाहतूक पोलिसांचा उद्दामपणा, दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टेम्पोत भरलं

दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं अंगलट, पोलीस निरीक्षकाबाबत ‘हे’ आदेश

नागपूर शहरातील रस्त्यांवर वाहनांची पार्किंग, वाहतूक कुठून करणार? महापौर म्हणतात…

PHOTOS : जगातील सर्वात महागडी पार्किंग, एवढ्या किमतीत आलिशान घरही बांधून होईल