
Pune Bus Rape Case: पुणे देशाचे शिक्षणाचे माहेरघर. राज्याची सांस्कृतिक राजधानी. परंतु पुन्हा एका अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील स्वारगटेसारख्या गजबजलेल्या बस स्थानकावर पहाटे शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. स्वारगेट बस स्थानकावर सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा असतो. या बसस्थानकावर २४ तास नेहमी वर्दळ असते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर या ठिकाणी असते. त्यानंतर पहाटे ५.३० वाजता अत्याचार प्रकरण घडले. यामुळे पुणे सांस्कृतिक पुणे हादरले आहे. या प्रकरणातील आरोपी आरोपी दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. गाडे हा शिरुर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे. त्यावर आमदार माऊल कटके यांनी प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी यासंदर्भातील सर्व आरोप आणि चर्चा फेटाळल्या आहेत.
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवरती अत्याचार करणारा आरोपी हा पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवाशी आहे. आरोपी हा शिरूर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार माऊली कटके यांचा कार्यकर्ता असल्याचे आरोप होत आहे. त्यानंतर आमदार कटके यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
आमदार माऊल कटके म्हणाले, मतदारसंघ हा अतिशय मोठा आणि विस्तृत आहे. मतदार संघातील कामानिमित्त अनेक लोक मला भेटत असतात. त्या आरोपीशी माझा कुठलेही संबंध नाही. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि केस फास्टटॅ्क कोर्टात हा खटला चालवावा, अशी मागणी माझी आहे, असे आमदार कटके यांनी म्हटले.
दरम्यान, गजबजलेल्या बस स्थानकावर घडलेल्या या प्रकरणानंतर शासनावर टीका होवू लागली आहे. या प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बैठक घेतली. आरोपीला ट्रॅक केले जात आहे. लवकरच तो पोलिसांच्या तावडीत सापडेल, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, २४ तास सुरक्षा पुरविण्याचे काम राज्य परिवहन मंहामंडळाचे आहे. स्वारगेट बस स्थानकावरील डेपो मॅनेजरने लक्ष ठेवले पाहिजे होते. या घटनेत त्यांनी दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणात परिवहन विभाग आपली जबाबदारी झटकू शकत नाही. आता लवकरच पोलिस आणि परिवहन विभाग यांच्यात सुरक्षेच्या संदर्भात चर्चा केली जाईल. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आरोपी ताब्यात आल्यावर बऱ्याच गोष्टी समोर येतील, असे कदम यांनी म्हटले.