जमिनीचा वाद टोकाला, सख्ख्या भावाकडून दुसऱ्या भावाची हत्या, इंदापूर हादरलं

इंदापूर तालुक्यातील अगोती नंबर एक येथे जमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावाचा खून केला. त्यामुळे इंदापूर उजनी परिसर या खून प्रकरणाने हादरून गेला आहे.

जमिनीचा वाद टोकाला, सख्ख्या भावाकडून दुसऱ्या भावाची हत्या, इंदापूर हादरलं
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 7:30 AM

पुणे : जमिनीच्या वादातून पुण्यातील इंदापूरमध्ये एकाची हत्या झाल्याची घटना घडली. इंदापूर तालुक्यातील अगोती नंबर एक येथे जमिनीच्या वादातून सख्या भावानेच भावाचा खून केला. त्यामुळे इंदापूर उजनी परिसर या खून प्रकरणाने हादरून गेला आहे.

प्रभाकर विठ्ठल पवार असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी ज्ञानदेव विठ्ठल पवार, सुधीर ज्ञानदेव पवार, शरद ज्ञानदेव पवार यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रभाकर पवार यांचे मेव्हणे राजकुमार जाधव यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळाला भेट दिलीय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

रेल्वे स्टेशनवर हत्या करुन ‘तो’ गर्दीत मिसळला, पोलिसांनी दहा दिवसात मुसक्या आवळल्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

VIDEO: भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार, हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलं

पुण्यात एकाच दिवशी दोन कुख्यात गुंडांच्या हत्या, एकावर गोळीबार, दुसऱ्यावर कोयत्याने वार

व्हिडीओ पाहा :

Murder of brother due to land dispute in Indapur Pune