VIDEO: भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार, हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 12, 2021 | 9:10 PM

पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात भर दिवसा धारधार शस्त्राने वार करत एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कानिफनाथ क्षीरसागर असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

VIDEO: भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार, हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलं
Follow us

पुणे : पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात भर दिवसा धारदार शस्त्राने वार करत एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कानिफनाथ क्षीरसागर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आरोपी आकाश जाधवने पीडित कानिफनाथ क्षीरसागरला रविवारी (11 जुलै) दुपारच्या सुमारास मंडप बांधायचं काम द्यायचं आहे असं सांगून त्याला एकांत स्थळी बोलवलं. त्यानंतर तो एका व्यक्तीशी बोलत असताना आरोपी आकाशने त्याच्यावर सपासप वार करत त्याची हत्या केली (Day light Murder of a person in Chikhali Pimpri Chinchwad).

हा हत्येचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. यामध्ये दिसत आहे की पीडित कानिफनाथ क्षीरसागर आपल्या मुलासह एका व्यक्तिशी बोलत आहे. तेवढ्यात आरोपी आकाश जाधव हातात पिशवी घेऊन येतो. पिशवीतून धारदार शस्त्र काढून कानिफनाथवर सपासप वार करतो. हल्ला झाल्यानंतर कानिफनाथ तेथून पळतो. मात्र, आरोपी आकाश जाधव त्याच्या मागे पाठलाग करुन हल्ला सुरूच ठेवतो. क्षीरसागर पळत गेल्यानंतर जाधवने दगडाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याची हत्या केली.

हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ पाहा :

हत्येचं कारण काय?

काही दिवसांपूर्वी आरोपी आकाश जाधववर काही जणांनी हल्ला केला होता. तो हल्ला कानिफनाथच्या सांगण्यावरून केल्याचा आरोपीला संशय होता. त्यामुळे त्याने या हल्ल्याचा बदला म्हणून कानिफनाथची हत्या केल्याचा दावा आरोपी आकाशने पोलिसांकडे केलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी आकाश जाधवला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

हेही वाचा :

पुण्यात एकाच दिवशी दोन कुख्यात गुंडांच्या हत्या, एकावर गोळीबार, दुसऱ्यावर कोयत्याने वार

नगर परिषदेच्या सभापतीकडून सामाजिक कार्यकर्त्यांची सुपारी देऊन हत्या, वाचा हत्येनंतरच्या 15 दिवसांच्या नाट्यमय घडामोडी

घरात एकाच खाटेवर रात्री सोबत झोपले, पहाटे उठल्यानंतर पती रक्ताच्या थारोळ्यात, मध्यरात्री काय घडलं? पत्नीला थांगपत्ताच नाही

व्हिडीओ पाहा :

Day light Murder of a person in Chikhali Pimpri Chinchwad

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI