नगर परिषदेच्या सभापतीकडून सामाजिक कार्यकर्त्यांची सुपारी देऊन हत्या, वाचा हत्येनंतरच्या 15 दिवसांच्या नाट्यमय घडामोडी

गडचिरोलीतील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांची 24 जूनच्या रात्री निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पंधरा दिवसात पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत (Gadchiroli Municipal Council Chairman Prashant Khobragade killed social activist Duryodhan Raipure due to political enmity)

नगर परिषदेच्या सभापतीकडून सामाजिक कार्यकर्त्यांची सुपारी देऊन हत्या, वाचा हत्येनंतरच्या 15 दिवसांच्या नाट्यमय घडामोडी
नगर परिषदेच्या सभापतीकडून प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्यांची सुपारी देऊन हत्या
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 4:40 PM

गडचिरोली : गडचिरोलीतील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांची 24 जूनच्या रात्री निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पंधरा दिवसात पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी हा गडचिरोली नगर परिषदेचा सभापती प्रशांत खोब्रागडे असून त्यानेच राजकीय वैमनस्यातून दुर्योधन रायपुरे यांची हत्या करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचे आता समोर आले आहे (Gadchiroli Municipal Council Chairman Prashant Khobragade killed social activist Duryodhan Raipure due to political enmity).

नेमकं काय घडलं?

दुर्योधन रायपुरे हे गडचिरोली शहरातील फुले वॉर्डात वास्तव्यास होते. गोरगरीब नागरिकांची कामे करणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. दरम्यान त्यांची 24 जून रोजी राहत्या घरात हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाची चक्रे फिरवली असता, पहिल्या आरोपीला गोंदिया येथून अटक करण्यात आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आणखी चार जणांना गोंदिया जिल्ह्यातूनच अटक करण्यात आली. चौघांचीही चौकशी केली असता नगरपालिकेचे सभापती प्रशांत खोब्रागडे यांनी दुर्योधन रायपुरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे आरोपींनी कबूल केले. गडचिरोली पोलिसांनी शुक्रवारी (9 जुलै) सभापती प्रशांत खोब्रागडे यालाही अटक केली आहे (Gadchiroli Municipal Council Chairman Prashant Khobragade killed social activist Duryodhan Raipure due to political enmity).

पोलिसांनी आरोपींनी बेड्या कशा ठोकल्या?

गडचिरोलीत दुर्योधन रायपुरे हे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांची 24 जूनला अचानक हत्या झाल्याने शहारात एकच खळबळ उडाली. याशिवाय शहरातील बड्या व्यक्तीचा अचानक खून झाल्याने पोलिसांवरही दबाव वाढला. पोलिसांनी या खूनामागील आरोपी शोधून काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा निश्चय केला. पोलिसांनी सुरुवातीला प्रशिक्षक श्वान पथक दाखल केले होते. या पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वान पथक आरमोरी मार्गावरील तलावापर्यंत पोहोचून थांबले होते. त्यामुळे या घटनेमागील रहस्य आणखी गूढ झाले होते.

आरोपींनी रायपुरे यांचा मोबाईल चोरुन नेला

आरोपींनी मोठ्या चतुराईने सर्व पुरावे नष्ट केले होते. मात्र, गुन्हेगार एक तरी असा पुरावा सोडून जातो किंवा चूक करतो ज्याने तो पोलिसांच्या नक्की हातात येतो, असं म्हणतात. तसंच काहीसं घडलं. आरोपींनी दुर्योधन रायपुरे यांचा खून करुन त्यांचा मोबाईला चोरुन नेला होता. पोलिसांनी रायपुरे यांच्या घरात तपास केला असता घटनास्थळावरुन रायपुरे यांचा मोबाईल गायब असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांना तपासात हाच मोबाईल जास्त उपयोगी पडला.

मोबाईल चालू करताच पोलिसांकडून आरोपीला बेड्या

पोलिसांनी रायपुरे यांचा मोबाईल नंबर सायबर सेलकडे पाठवला. दुसरीकडे पोलिसांचा वेगवेगळ्या मार्गाने तपास सुरुच होता. या दरम्यान आरोपी अमन काळसर्पे (वय 18) याने रायपुरे यांचा मोबाईल सुरु केला. त्याने मोबाईलमधून रायपूरे यांचं सीम काढून स्वत:चं सीम टाकलं. याबाबत लगेच सायबर सेलकडे माहिती गेली. सायबर सेलकडे मोबाईलच्या लोकेशनची माहिती गेली. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी अमन काळसर्पेला अटक केली.

पहिल्या आरोपीला पोलिसी खाक्या दाखल्यानंतर तीन आरोपींची नावे उघड

पोलिसांनी आरोपी अमनला कोर्टात हजर करुन त्याची पोलीस कोठडी मागितली. कोर्टाकडून त्याची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देत त्याच्या इतर सदस्यांची माहिती दिली. पोलिसांनी त्या माहितीच्या आधारावर आरोपी प्रसन्ना रेड्डी (वय 24), अविनाश मत्ते (वय 26), धनंजय उके (वय 31) या तिघांना अटक केली.

अखेर मुख्य आरोपीचं नाव उघड

पोलिसांनी या सर्व आरोपींची कोर्टात हजर केलं असता आरोपींना 13 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यादरम्यान पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता या प्रकरणातील मुख्य आरोपीचा उलगडा झाला. नगर परिषदेचा वित्त व नियोजन सभापची प्रशांत खोब्रागडे याने आरोपींना रायपुरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली.

सभापतीकडून आरोपींना सुपारीचे 50 हजार रुपये अदा

आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय अडथळा बाजूला करण्याच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार म्हणून दुर्योधन रायपुरे यांना संपवण्याचा कट प्रशांत खोब्रागडे याने रचला. कारण गेल्या डिसेंबर 2016 च्या निवडणुकीत रायपुरे यांचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे त्यांचा काटा काढण्यासाठी आरोपी प्रशांत खोब्रागडे याने गोंदिया जिल्ह्यातील चार जणांना पाच लाखांची सुपारी दिली होती. त्यापैकी 50 हजार रुपये अदा करण्यात आले होते.

हेही वाचा : CSR फंडाचे आमिष दाखवून गावकऱ्यांची फसवणूक, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.