CSR फंडाचे आमिष दाखवून गावकऱ्यांची फसवणूक, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Fraud | अनिरुद्धने आरोपीने शिरूर तालुक्यातील आंधळगाव,शिरसगाव काटा,गणेगाव दुमाला, कुरुळी, कोळगाव डोळस,या गावच्या सरपंचांना ही सीएसआर फंडातून विकास कामे करून देऊ असे सांगत फसवणूक केली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

CSR फंडाचे आमिष दाखवून गावकऱ्यांची फसवणूक, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना ईडीचे समन्स, 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता प्रकरणी नोटीस

पुणे: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक गावांना सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (CSR Fund) पैशांचे आमिष दाखवून ग्रामपंचायत सरपंचाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अनिरुद्ध टेमकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Police arrested person for CSR Fraud in Pune)

अनिरुद्ध टेमकर गावच्या सरपंचांना कॉल करत तुम्हाला गावच्या विकासासाठी सीएसआर फंडातून विकास कामे करून देऊ असे सांगत स्वत:च्या बँक खात्यावर काही रक्कम डिपॉझिट करायला सांगायचा. मात्र, काही काळानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे अनेक सरपंचांच्या लक्षात आले.

अनिरुद्धने आरोपीने शिरूर तालुक्यातील आंधळगाव,शिरसगाव काटा,गणेगाव दुमाला, कुरुळी, कोळगाव डोळस,या गावच्या सरपंचांना ही सीएसआर फंडातून विकास कामे करून देऊ असे सांगत फसवणूक केली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

गुटख्याची अवैध वाहतूक करणारे जेरबंद

पिंपरी-चिंचवडमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. यावेळी तब्बल 52 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली.

हे तिघेहीजण गाडीला बनावट नंबर टाकून अवैध गुटखा व पानमसाला पदार्थांची वाहतूक करायचे. त्यांच्याकडून 100 पोती विमल पानमसाला व त्यासाठी लागणारी तंबाखू 100 पोती ,चारचाकी, मोबाईल फोन, असा एकूण 52.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.गणेश वंजी साबळे,संदीप गुलाब ठाकरे व विशाल पांडुरंग लवाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

संबंधित बातम्या:

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा काही गुन्हेगारांना ‘मौका’ तर काहींवर ‘मोक्का’, पाहा नेमकं प्रकरण काय?

मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाज तरुणांची दहशत, तरुणाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, परिसरात चोरांचाही सुळसुळाट

रेल्वेत घुसून गर्दीचा फायदा घ्यायचा, संधी मिळताच डाव साधायचा, सराईत गुन्हेगाराला अखेर बेड्या

(Police arrested person for CSR Fraud in Pune)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI