नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा काही गुन्हेगारांना ‘मौका’ तर काहींवर ‘मोक्का’, पाहा नेमकं प्रकरण काय?

गुन्हेगार सुधार योजना मेळाव्याच्या माध्यमातून शहरातील विविध पोलीस ठाण्यातील तब्बल 250 गुन्हेगारांकडून गुन्हे न करण्याचं हमी पत्र भरून घेत त्यांना कारवाई पासून पोलिस आयुक्त श्री दीपक पांडे यांनी मुक्त केलंय... (Criminal Reform melava in nashik police commissioner Dipak Pandey)

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा काही गुन्हेगारांना 'मौका' तर काहींवर 'मोक्का', पाहा नेमकं प्रकरण काय?
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे

नाशिक : रागाच्या भरात माणूस चुकीचं पाऊल उचलतो, काहीतरी गुन्हा त्याच्या हातून होतो. पण नंतर त्याला पश्चाताप होतो, अशा आरोपींना सुधारण्याचा मोका नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) दिला आहे. तर नाशिकच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या आड येणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई केलीय. (Criminal Reform melava in Nashik Police Commissioner Dipak Pandey)

आरोपींना सुधारण्याची संधी

एखादा माणूस रागाच्या भरात किरकोळ कारणातून असा काही गुन्हा करून बसतो. की त्याला त्या गोष्टीचा आयुष्यभर पश्चाताप होतो आणि आपलं आयुष्य चार भिंतीच्या आड जेलमध्ये घालवावं लागतं… असे अनेक गुन्हेगार नाशिक जिल्ह्यातील कारागृहात शिक्षा भोगत आहेत.मात्र एखादा गुन्हा घडला म्हणून तो व्यक्ती वाईटच असतो,असं नसत.. त्याला जर एखादी संधी मिळाली तर त्याच्या आयुष्यातही परिवर्तन होत असतं, हाच विचार लक्षात घेता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हेगारांना सुधारण्याची एक संधी दिलीय…

गुन्हेगार सुधार योजना मेळावा, नाशिकच्या पोलिस आयुक्तांचा अभिनव उपक्रम

गुन्हेगार सुधार योजना मेळाव्याच्या माध्यमातून शहरातील विविध पोलीस ठाण्यातील तब्बल 250 गुन्हेगारांकडून गुन्हे न करण्याचं हमी पत्र भरून घेत त्यांना कारवाई पासून पोलिस आयुक्त श्री दीपक पांडे यांनी मुक्त केलंय..

108 गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई

गुन्हेगार सुधार योजना मेळाव्याच्या माध्यमातून पोलिस आयुक्तांनी आयुष्यात कसं जगायचं, गुन्हे केल्याने काय वाईट परिणाम होतात, आयुष्य उध्वस्त होतं… याबद्दल मोलाचं आरोपींना मार्गदर्शन केलं. मात्र एकीकडे हे जरी असलं तरी दुसरीकडे मात्र शहर वासियांमध्ये आपल्या गुन्हेगारीतून दहशद निर्माण करणाऱ्या तब्बल 108 गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलीये. त्यामुळे संधी जरी दिली, तरी सुरक्षेच्या दृष्टीने आड येणाऱ्यांवर कारवाई ही होईलच… हेच पोलिस आयुक्तांनी दाखवून दिलंय.

(Criminal Reform melava in nashik police commissioner Dipak Pandey)

हे ही वाचा :

मिरज रेल्वे स्थानकावर नशेबाज तरुणांची दहशत, तरुणाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, परिसरात चोरांचाही सुळसुळाट

ईडीची धडाकेबाज कामगिरी सुरुच, तळोजा जेलमध्ये सचिन वाझेचा जबाब, नेमकं काय-काय विचारलं?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI