AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीची धडाकेबाज कामगिरी सुरुच, तळोजा जेलमध्ये सचिन वाझेचा जबाब, नेमकं काय-काय विचारलं?

ईडीकडून API सचिन वाझे याची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज (10 जुलै) तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझेची चौकशी केली (ED officers recorded Sachin Vaze statement at Taloja Jail).

ईडीची धडाकेबाज कामगिरी सुरुच, तळोजा जेलमध्ये सचिन वाझेचा जबाब, नेमकं काय-काय विचारलं?
सचिन वाझे
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 7:24 PM
Share

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित 100 कोटी वसूलीच्या आरोपांप्रकरणी ईडीकडून तपास सुरु आहे. या प्रकरणाचा तपास ईडीकडून प्रचंड वेगाने सुरु आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करत असताना माजी गृहमंत्र्यांच्या घर आणि कार्यालयांवरही छापा टाकला आहे. तसेच देशमुखांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली आहे. त्या दोन्ही सचिवांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर आता ईडीकडून API सचिन वाझे याची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज (10 जुलै) तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझेची चौकशी केली (ED officers recorded Sachin Vaze statement at Taloja Jail).

ईडी अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला चौकशीत काय-काय विचारलं?

ईडीने याआधी अनिल देशमुखांच्या दोन सचिवांची चौकशी केली आहे. तसेच काही बार मालकांची देखील चौकशी केली आहे. काही बारमालकांनी ईडी अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात सचिन वाझेंना पैसे दिल्याचे कबूल केले आहे. तसेच देशमुखांचे दोन्ही सचिव वसूलीच्या रकमेबाबत ठरवायचे, असा युक्तीवाद ईडीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात केला होता. त्यामुळे याच माहितीच्या आधारावर ईडी अधिकारी सचिन वाझेची चौकशी करत होते. ईडी अधिकाऱ्यांनी सचिन वाझेची जवळपास सलग सहा तास चौकशी केली.

ईडी अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला परमबीर सिंग यांनी केलेल्या लेटरबॉम्ब विषयी विचारलं. या लेटरबॉम्बमध्ये अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर सचिन वाझेची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. तसेच 100 कोटी वसुलीच्या आरोपांबाबत प्रश्न विचारले. तसेच बार मालक आणि इतर साक्षीदार यांनी दिलेल्या जाबाबाविषयी विचारण्यात आलं (ED officers recorded Sachin Vaze statement at Taloja Jail).

सचिन वाझेची आणखी दोन दिवस चौकशी चालणार

सचिन वाझेची आणखी दोन दिवस चौकशी चालणार आहे. सचिन वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे. जेल मॅन्युअलप्रमाणे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या दरम्यान आरोपीची चौकशी करता येते. त्यानुसार आता त्याची चौकशी संपली आहे. सचिन वाझे याची आणखी दोन दिवस चौकशी चालणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे याची 3 दिवस चौकशी करण्याची परवानगी घेतली आहे.

परमबीर सिंग यांचे देशमुखांवर नेमके आरोप काय?

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख API सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेत मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते

संबंधित बातम्या :

अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांचा ईडी मुक्काम वाढला, 20 जुलैपर्यंत कोठडीत वाढ

बार, पबमधून कोट्यवधींची वसूली, प्रत्येक झोनमधून सचिन वाझेला पैसे, नंतर ते अनिल देशमुखांकडे, ईडीच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा

पालांडे डील करायचे, कुंदन कॅश स्वीकारायचा, देशमुखांच्या PA वर आरोप, ED पुन्हा समन्स पाठवणार

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.