पालांडे डील करायचे, कुंदन कॅश स्वीकारायचा, देशमुखांच्या PA वर आरोप, ED पुन्हा समन्स पाठवणार

ईडीने तपासासाठी अनिल देशमुख यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे आणि खासगी पीए कुंदन शिंदे यांना कालच (25 जून) ताब्यात घेतलं आहे. पण त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य न केल्याने दोघांना अटक करण्यात आली (ED will send summons to Maharashtra former home minister Anil Deshmukh again).

पालांडे डील करायचे, कुंदन कॅश स्वीकारायचा, देशमुखांच्या PA वर आरोप, ED पुन्हा समन्स पाठवणार
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित 100 कोटी वसुलीप्रकरणाचा आरोपांचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या तपासात ईडीच्या हातात अनेक पुरावे लागताना दिसत आहेत. ईडीने काही बार मालकांची चौकशी केली असता देशमुखांना 4 कोटींचा हप्ता दिल्याची कबुली जबाब काहिंनी दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने तर आणखी वेगाने तपास सुरु केला. तपासासाठी ईडीने अनिल देशमुख यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे आणि खासगी पीए कुंदन शिंदे यांना कालच (25 जून) ताब्यात घेतलं आहे. पण त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य न केल्याने दोघांना अटक करण्यात आली (ED will send summons to Maharashtra former home minister Anil Deshmukh again).

पालांडे आणि शिंदे यांचा गैरव्यवहारात महत्त्वाचा रोल

ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासात देशमुख यांचे दोन्ही स्वीय साहाय्यक हे देखील दोषी ठरताना दिसत आहेत. जो पैशांचा गैरव्यवहार केला जायचा त्यामध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा महत्त्वाचा रोल होता, अशी माहिती ईडी अधिकाऱ्यांच्या तापासातून समोर आली आहे. देशमुख यांचा पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे हा व्यवहार निश्चित करायचा तर दुसरा पीए कुंदन शिंदे हा पैसे स्वीकारायचा, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. दोघं स्वीय साहाय्यकांची सध्या चौकशी सुरु आहे. पण ईडी आता देशमुखांची पुन्हा चौकशी करणार आहे (ED will send summons to Maharashtra former home minister Anil Deshmukh again).

अनिल देशमुख यांना पुन्हा समन्स

संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या चौकशीत कदाचित भरपूर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर ईडी अधिकारी पुन्हा अनिल देशमुख यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच ईडी देशमुख यांना पुन्हा समन्स पाठवणार आहे. त्यानुसार देशमुख यांना पुढच्या आठवड्यात पुन्हा ईडीच्या चौकशीच्या ससेमीराला सामोरं जावं लागणार आहे. या प्रकरणात आणखी नेमकी काय काय नवी माहिती समोर येते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.

काल दिवसभरात काय-काय घडलं?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीची धडक कारवाई सुरु आहे. ईडी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सकाळपासून तब्बल पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये देशमुख यांच्या नागपुरातील घराचा देखील समावेश आहे. तसेच ईडीने देशमुख यांच्या नागपुरात व्यावसायातील भागीदार असलेल्या व्यवसायिकाच्या घरीदेखील छापा टाकला आहे. याशिवाय मुंबईतील देशमुख यांचं शासकीय निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला, त्यांचं स्वत:चं वरळी येथील घर असलेली सुखदा इमारत तसेच त्यांचा CA राहत असलेल्या वरळी येथील घरी देखील ईडीने छापा टाकला आहे. ईडीची सकाळपासून ही कारवाई सुरु आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक अशी ही कारवाई केली जात असल्याचं निदर्शनास आलं. प्रत्येक छापेमारीवेळी ईडीसोबत सीआरएफ जवनांचं एक पथकही घटनास्थळी दाखल होते.

अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले. त्यांच्या संशयास्पद भूमिकेवरुन त्यांना आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आरोप केले. त्यांना आरोप करायचे होते तेव्हा ते आयुक्त असताना त्यांनी माझ्यावर आरोप करायला हवे होते”, अशी भूमिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल मांडली.

सचिन वाझेचाही तुरुंगातून जबाब

दुसरीकडे तळोजा कारागृहातून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचाही जबाब नोंदवण्यात आला. तसंच ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

दोन्ही पीए अटकेत, अनिल देशमुखांवर अटकेची टांगती तलवार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI