AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात खळबळ, पोलीस चौकीत पोलिसाने स्वतःवर गोळ्या झाडल्या

Pune Crime News: पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. भारत दत्ता आस्मर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीतील ही घटना घडली.

पुण्यात खळबळ, पोलीस चौकीत पोलिसाने स्वतःवर गोळ्या झाडल्या
भारत दत्ता आस्मर
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 05, 2024 | 3:18 PM
Share

पुणे शहरात खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस चौकीतच एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. भारत दत्ता आस्मर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीतील ही घटना घडली. शुक्रवारी पहाटे पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद किंवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी जीवन संपवले, हे चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

गुरुवारी रात्रपाळीसाठी आले अन्…

पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात भारत आस्मर हे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी ते कामावर आले होते. त्यांची नेमणूक असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीत गेले. रात्री आपली बंदूक सोबत घेऊन वर असणाऱ्या खोलीत आरामासाठी गेले. परंतु अचानक काय झाले त्यांनी स्वत:वर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

दहा वर्षांपूर्वी पोलीस दलात

भारत दत्ता आस्मर मागील काही दिवसांपासून तणावात होते. परंतु त्यासंदर्भात ते कोणाकडे काही बोलले नव्हते. त्यांच्या तणावाचे कारण समजले नव्हते. गेल्या आठ, दहा वर्षांपूर्वी ते पोलीस दलात दाखल झाले होते. या घटनेची आता चौकशी करण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये घडली होती घटना

नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्यात पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यावेळी अंबड पोलीस ठाण्यात अशोक नजन नावाच्या पोलीस निरीक्षकाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आपल्या केबिनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली. बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्यावर सहकाऱ्यांनी केबिनकडे धाव घेतली असता नजन खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसले होते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी