Pune Protest : पुण्यात कात्रज पाणी प्रश्न पेटला, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

| Updated on: Apr 19, 2022 | 3:58 PM

लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरवा करुनही ते दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते नरेश बाबर यांच्या अध्यक्षतेखाली कात्रजसह गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी येथील नागरिक उपोषणाला बसले आहेत.

Pune Protest : पुण्यात कात्रज पाणी प्रश्न पेटला, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
पुण्यात कात्रज पाणी प्रश्न पेटला
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

पुणे : पुण्यातील कात्रजमध्ये पाणी प्रश्न पेटला आहे. पाणी प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकां (Protesters)वर पोलिसांनी लाठीचार्ज केला. वारंवार सूचना देऊनही कार्यकर्ते ऐकत नसल्याने लाठीचार्ज करावा लागल्याचे पुणे पोलिसांना स्पष्ट केले आहे. कात्रज भागात पाण्यासाठी 3 दिवसांपासून आंदोलन (Protest) सुरु आहे. सामाजिक कार्यकर्ते नमेश बाबर यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरु आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही कात्रजचा विकास झाला नाही. महापालिकेत समावेश होऊन 25 वर्षे उलटली तरी कात्रजमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. यामुळे स्थानिक नागरिक उपोषणाला बसले आहेत. (Protest for water at Katraj in Pune police beatened to protesters)

पाण्यासह अन्य मूलभूत सुविधांचा अभाव

लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरवा करुनही ते दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते नरेश बाबर यांच्या अध्यक्षतेखाली कात्रजसह गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी येथील नागरिक उपोषणाला बसले आहेत. कात्रजसह अन्य समाविष्ट गावांचा पाण्याचा प्रश्न, वाहतूक समस्यांसह अन्य मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी उपोषण सुरु होते. मात्र पोलिसांनी हे उपोषण बंद पाडले. (Protest for water at Katraj in Pune police beatened to protesters)

इतर बातम्या

Nanded | बिल्डर संजय बियाणींच्या हत्येचे गूढ कायम, CBI कडे तपासाची मागणी, खा. चिखलीकर उद्या निदर्शनं करणार

Maharashtra DGP Loudspeaker Policy : सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत अधिकाऱ्याची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता ?