Pune : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणाची आत्महत्या! पुण्यात खळबळ, का उचललं टोकाचं पाऊल?

Pune crime News : 32 वर्षीय महेशने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचा आता सिंहगड पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. पोलिसांनी या आत्महत्येच्या घटनेची नोंद करुन घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नैराश्यापोटी त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

Pune : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणाची आत्महत्या! पुण्यात खळबळ, का उचललं टोकाचं पाऊल?
धक्कादायक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 9:18 AM

पुणे : पुण्यात एका 32 वर्षीय तरुणाने स्वतःच्या हाताने कटरने स्वतःचा गळा चिरला आणि आत्महत्या (Pune Suicide) केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव महेश राजाराम तवंडे असं आहे. तो पुण्यातील सिंहगड रोड येथील धायरीमध्ये (Dhayari) लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (Live in relationship) राहात होता. या तरुणाच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरुणाच्या आत्महत्येनं तो ज्या इमारतीत राहत होता, तिथं खळबळ माजलीय. ओम नमः सोसायटी, मुक्ताई नगर, रायकर मळा इथं हा तरुण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.

का केली आत्महत्या?

32 वर्षीय महेशने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचा आता सिंहगड पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. पोलिसांनी या आत्महत्येच्या घटनेची नोंद करुन घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नैराश्यापोटी त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पण त्याला नेमकं नैराश्य का आलं होतं, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

LIVE Video : पाहा ताज्या घडामोडी

हे सुद्धा वाचा

कटरने स्वतःचा गळा चिरला

धक्कादायक बाब म्हणजे महेशने स्वतःच्या हातानेच कटरने गळा चिरला आणि आयुष्य संपवलं. त्याच्या गळ्यावर आणि शरिरावर कटरचे वार दिसून आलेत. महेश पुण्यात ग्राफिक डिझाईनर म्हणून काम करायचा. तो मूळचा कोल्हापूरचा होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिच्यासोबत तो लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता, ती मैत्रिण गणेशोत्सवापासून बाहेरगावी गेली होती, अशी माहिती समोर आलीय.

रात्री घरमालकाला संशय आला म्हणून त्याने याबाबत सिंहगड पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी तातडीने याप्रकराची गंभीर दखल घेतली आणि महेशचं घर गाठलं. महेशच्या घराचं दार बंद होतं. अखेर पोलिसांनी फ्लॅटचा दरवाडा तोडला आणि ते आत शिरले. त्यावेळा महेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आता महेशचा मृतदेह पुढे तपासणी पाठवण्यात आला असून सिंहगड पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?.
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ.
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्..
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्...
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली.
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम.
यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, दादांच्या बंडानंतर नात्यात फूट
यंदा पवार कुटुंबाचे वेग-वेगळे पाडवे, दादांच्या बंडानंतर नात्यात फूट.