Pune: मागाल ती गाडी चोरुन आणायचा! पुणे शहरातील विचित्र चोर अखेर अटकेत

कुणाला चोरीचा संशय येऊ नये म्हणून अट्टल गुन्हेगाराची काय होती मोड्स ऑपरेंडी? तपासात उघड

Pune: मागाल ती गाडी चोरुन आणायचा! पुणे शहरातील विचित्र चोर अखेर अटकेत
सहा दूध उत्पादकांना अटकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 8:09 AM

पुणे : पुणे शहरात एका चोरट्याला पोलिसांनी अटक (Pune Bike Theft) केलीय. हा चोरचा मागणीनुसार गाड्या चोरत असल्याचं पोलिसांच्या तपासातून (Pune Crime News) उघड झालंय. विशेष म्हणजे कुणाला चोरीचा संशय येऊ नये यासाठी तो पुणे शहराच्या बाहेर जाऊन गाड्यांची चोरी करत असे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अजय झेंडे (Ajay Zende) असं आहे. सध्या त्याची कसून चौकशी केली जातेय. अजय झेंडे याला अटक करण्यासोबत पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 20 हून अधिक दुचाकी जप्त केल्यात.

पुण्यातील हडपसर परिसरात 10 लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या दुचाकी चोरणारा अट्ट्ल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाय. आरोपी अजय झेंडे या 32 वर्षीय चोराला पोलिसांनी अटक केलीय. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरु आहे.

अजय मागणीनुसार गाड्या चोरायचा. त्यानंतर गाड्यांचे नंबर प्लेट बदलून त्याच्या मित्राला विकायचा. मित्र यल्लाप्पा बेल्ले या 34 मित्राला चोरलेल्या दुचाकी चोरून अजय पैसे कमवत होता.

बेल्ले हा अजय झेंडे यांना गाडी चोरण्यासाठी सांगायचा. कधी एका विशिष्ट कंपनीची गाडी हवी असेल तर बेल्ले हा झेंडेला ती हवीय असं सांगून संशय येऊ नये म्हणून शहराच्या बाहेरील भागातून गाडी चोर असे आदेश द्यायचा.

अटक करण्यात आलेला अजय झेंडे हा मूळचा दौंड येथील असून तो पुण्यात किरकोळ काम करायचा, असंही समोर आलंय. झेंडे गाड्या चोरून सोलापूरला घेऊन जायचा. आणि बेल्लेकडे सोपवायचा.

पोलीस ठाण्यात या आधी अजय झेंडे याच्यावर एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. दरम्यान, आता पुणे पोलिसांच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ नी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.