AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फौजदार की ड्रग्स तस्कर, पुण्यातील शेळकेकडून आणखी दोन कोटींचे ड्रग्स जप्त

Pune Crime News | ड्रग्सच्या माध्यमातून कोट्यधीश होण्याचा प्रयत्न पुणे शहरातील फौजदार विकास शेळके याच्या चांगलाच अंगलट आला. त्याच्या चौकशीत आणखी ड्रग्स मिळाले आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे.

फौजदार की ड्रग्स तस्कर, पुण्यातील शेळकेकडून आणखी दोन कोटींचे ड्रग्स जप्त
विकास शेळके
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 06, 2024 | 7:50 AM
Share

पुणे | दि. 6 मार्च 2024 : पुणे शहरातील पोलीस दलाची चर्चा सातत्याने सुरु असते. ससून रुग्णालयातून ड्रग्स तस्कर ललित पाटील पोलिसांसमोरच फरार झाला होता. त्या प्रकरणात काही पोलीस कर्मचारी बडतर्फ झाले. हे प्रकरण शांत होत नाही, तोपर्यंत आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक असलेल्या विकास शेळके याने झटपट श्रीमंत होण्यासाठी ड्रग्स लंपास करण्याचा प्रयत्न केला. मेफेड्रोन नावाचे ड्रग्स त्याच्याकडून जप्त केले गेले. त्याने ४५ कोटी रुपयांचे ड्रग्स परस्पर विकून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहिले होते. हे ड्रग्स विकण्यासाठी नामचीन गुन्हेगाराशी संपर्क केला होता. पण हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस चौकशीतून आणखी दोन कोटींचे ड्रग्स त्याच्या मोटारीतून जप्त करण्यात आले.

दोन कोटींचे ड्रग्स जप्त

पिंपरी- चिंचवडमधील निगडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी विकास शेळके कार्यरत होता. प्रकरण उघड झाल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले आहे. त्याच्याकडील ४४ कोटी ७९ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यानंतर विकास शेळके याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने आपल्या मोटारीत आणखी ड्रग्स असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोटारीतील ड्रग्स जप्त केले. दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन ड्रग्स हे होते. त्याची किंमत दोन कोटी रूपये आहे.

शेळकेने झा याला ड्रग्स विकण्यासाठी पाठवले

मेफेड्रोन विकण्यासाठी रावेत परिसरातील एका नामचीन गुन्हेगारास विकास शेळके याने संपर्क केला. त्यासाठी नमामी झा याला त्या गुन्हेगाराकडे पाठवले. परंतु त्या गुन्हेगाराने सांगवी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला याबाबत टीप दिली आणि प्रकार उघड झाला.

अटक न करण्यासाठी मागितले पैसे

पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मागील महिन्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील संशयिताला शेळके याने नाशिक फाटा येथे बोलवले. त्यानंतर त्याचा मोबाइल काढून घेत अटक न करण्यासाठी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणात संबंधित व्यक्तीने तक्रार दिली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी