विकृतीचा कळस, डॉक्टर महिलेला व्हिडीओ कॉलवर NUDE होण्यास सांगितलं; त्यानंतर जे घडलं त्याने महिलाही अक्षरश: हादरली

पुण्यात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाने विवाहित महिला डॉक्टरसोबत विकृत कृत्य केलं आहे. गुजरातच्या या तरुणाने डॉक्टर महिलेला व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केले, इतकंच नाही तर या तरुणाने ते अश्लील व्हिडीओ महिलेच्या पतीला देखील पाठवले.

विकृतीचा कळस, डॉक्टर महिलेला व्हिडीओ कॉलवर NUDE होण्यास सांगितलं; त्यानंतर जे घडलं त्याने महिलाही अक्षरश: हादरली
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 2:39 PM

पुणे : पुण्यात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाने विवाहित महिला डॉक्टरसोबत विकृत कृत्य केलं आहे. गुजरातच्या या तरुणाने डॉक्टर महिलेला व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केले, इतकंच नाही तर या तरुणाने ते अश्लील व्हिडीओ महिलेच्या पतीला देखील पाठवले. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रणव पांचाळ नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केलाय.

प्रणव पांचाळ हा गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील अटलादरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित डॉक्टर महिला ही विवाहित आहे. काही दिवसांपूरर्वीच तिची प्रणव पांचाळशी ओळख झाली होती.

लग्नाचं आमिष दाखवून महिलेची फसवणूक

प्रणव पांचाळची काहीच दिवसांपूर्वी पीडित महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तो तिच्याशी व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉलवर बोलायचा. त्याने महिलेला व्हिडीओ कॉलवर नग्न होण्यास भाग पाडले आणि त्याने त्याचा व्हिडीओही स्क्रिन रेकॉर्ड केला. महिलेला याबाबत जराही शंका नव्हती. मात्र, प्रणव पांचाळने तो अश्लील व्ंहिडीओ पीडित महिलेच्या ई-मेलवर पाठवून दिला. तो यावरच थांबला नाही तर त्याने हा व्हिडीओ महिलेच्या पतीलाही पाठवला.

इतकंच नाही तर त्याने हा व्हिडीओ पीडित महिलेच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी करण्याची धमकीही दिली. त्यामुळे पीडित महिलेने थेट पोलिसांत धाव घेतली. पीडित महिलेचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. याप्रकरणी आता वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

धक्कादायक, नागपुरात दर महिन्याला 18 महिलांवर अत्याचार; विनयभंग, अपहरणाची संख्या वाढली!

डेटिंग अ‍ॅपवरील ओळख महागात, लग्नाच्या आमिषाने पुण्यातील महिलेची 73 लाखांना फसवणूक